दावते इस्लामिक हिंदतर्फे प्रांत कार्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:55+5:302021-07-08T04:12:55+5:30
भुसावळ : शहरात फैजान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन शाखा अंतर्गत सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी हिंदतर्फे गेल्या ...
भुसावळ : शहरात फैजान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन शाखा अंतर्गत सामाजिक व धार्मिक संस्था दावते इस्लामी हिंदतर्फे गेल्या वर्षीप्रमाणे शहरातील विविध भागात वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
‘पौदा लगाना है और दरख़्त बनाना है’ या घोषणेने मोहिमेची सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, कोर्ट परिसर, खडका रोड, स्मशानभूमी, इदगाह इत्यादी ठिकाणी शंभराहून अधिक झाडे लावण्यात आली.
कोरोना साथीच्या आजाराचे बिघडलेले ऑक्सिजन संतुलन लक्षात घेता दावते इस्लामिक हिंद यांनी देशभरात १ दशलक्ष २० लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने भारतातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, किमान एक रोपटे लावावे व त्याची काळजी घ्यावी आणि ते मोठे झाड बनवावे.
यावेळी माजी नगराध्यक्ष शफी पहलवान, नगरसेवक उल्हास पगारे, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी, इम्तियाज सेठ, माजी नगरसेवक साबीर शेख, पोलीस अधीक्षक एम.के. खैरगे, मौलाना अब्दुल हकीम, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. कापडे, ॲड. काझी, रंगरेज उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यात इम्रान सय्यद, अझर कादरी, शोएब आत्तरी, जहांगीर शेख, आसिफ आत्तरी, युसुफ खान, जुबैर आत्तरी आणि रफिक रोशन शेख यांनी मदत केली.