धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात २२३४ रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:16+5:302021-07-19T04:12:16+5:30
जळगावात रामेश्वर कॉलनी, महादेव मंदिरात महापौर जयश्री महाजन यांनीही वृक्षरोपण केले. यावेळी नगरसेवक सुनील चुडामण पाटील, आशुतोष ...
जळगावात रामेश्वर कॉलनी, महादेव मंदिरात महापौर जयश्री महाजन यांनीही वृक्षरोपण केले. यावेळी नगरसेवक सुनील चुडामण पाटील, आशुतोष पाटील, ललित धांडे यांची उपस्थिती होती. मागील वर्षी ४००० वृक्षांचे रोपण करून त्याचे संवर्धन श्रीसदस्यांनी केले. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव पर्याय असून पुढील पिढ्या व सजीवसृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यावश्यक आहे. यासाठी सर्वत्र वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्त केले.
तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक उद्याने तसेच ओपन स्पेस येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात तरुण श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता. हे वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार श्रीसदस्यांनी केला आहे. जळगावमधील वाढते जंगल आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांची वानवा आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात व तालुक्यात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडाय ऑक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
असे झाले वृक्षारोपण
जळगाव शहरात -१०८०,
जामनेर-५८२,
एरंडोल - ३७६,
धरणगाव- २५६,
एकूण २२३४