प्लाझ्मा दान देऊ शकते अनेकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:01+5:302021-04-21T04:17:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत असून यात मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या अधिक ...

Plasma can save lives | प्लाझ्मा दान देऊ शकते अनेकांना जीवदान

प्लाझ्मा दान देऊ शकते अनेकांना जीवदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत असून यात मध्यम व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना जर कोरोनामुक्त रुग्णाने प्लाझ्मा दान केला तर रुग्ण धोक्याबाहेर येऊ शकतो, यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते, त्यामुळे यासाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून अशा रुग्णांनी समोर यावे, असे आवाहन रेडक्रॉस रक्तपेढीकडून करण्यात आले आहे.

प्लाझ्मा थेरपी ही १०० वर्षापासून प्रचलित असलेली वैश्विक महामारीत उपयुक्त पद्धती आहे. या थेरेपीचा वापर १९१८, २००२, २००९, २०१३ मध्ये देखील करण्यात आला आहे. कोविडच्या रुग्णांमध्ये ‘प्रायोगिक तत्वावर’ वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने अर्थात आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या रूग्णांवर ज्यांना २-३ लिटर प्रति मिनीट ऑक्सिजनची गरज भासत आहे व पुढील काळात रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याचा धोका जास्त आहे, ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा रूग्णांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुचविल्यास व नातेवाईकांनी संमती दिल्यास प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपी देण्यात येते. मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरातून प्लाझ्मा थेरेपीचा वापर होत आहे. प्लाझ्मा दानाच्या चळवळीत टास्क फोर्सचे डॉ. सुशील गुर्जर, डॉ. लीना पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. कल्पेश गांधी, डॉ. निलेश चांडक, डॉ. अभय जोशी, डॉ. रविंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळत, असल्याचे रेडक्रॉस रक्तपेढीतर्फे कळविण्यात आले आहे.

प्लाझ्मा थेरेपी कुणासाठी उपयुक्त

आयसीएमआरने मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णावर ज्यांना ताप, दम लागणे, श्वसनाची गती २४ प्रति मिनिट पेक्षा जास्त व ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी (शक्यतो ८८ ते ९३ टक्के विना (ऑक्सीजन पुरवठा असते) असलेल्या व आजाराच्या गंभीर अवस्थेत न रूपांतरीत झालेल्या रूग्णांनाच ही थेरपी द्यावी असे सुचविले आहे. गंभीर अवस्थेत या उपचार पद्धतीचा वापर टाळावा, कारण ती या अवस्थेत फारशी प्रभावी नसल्याने आढळून आले आहे.

कोण देऊ शकतो प्लाझ्मा

कोविड रुग्णाचा आजार मध्यम स्वरूपाचा असेल तर बरा झालेला कोविड रुग्ण २८ दिवस सर्व लक्षणापासून मुक्त असा रुग्ण आपला प्लाझ्मा देऊन जीवनदान देऊ शकतो. झ्मा टेस्टिंग, कोविड अँटीबॉडीजचे योग्य प्रमाण व इतर तपासण्या करून मगच "प्लाझ्माफेरेसिस" ने कोविड प्लाझ्मा उपलब्ध करून देऊ शकतो. या पद्धतीने ५ ते ८ तासात प्रमाणीत प्लाझ्मा रुग्णाला मिळू शकतो.

रुग्णांना प्रोत्साहन आवश्यक

कोविड हॉस्पीटलचे डॉक्टर्स, समुपदेशक आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानाकरीता अशा दात्यांना प्रोत्साहन द्यावे जेणे करून त्यांच्या मागणी प्रमाणे प्लाझ्मा उपलब्ध करणे शक्य होईल, असे आवाहन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Web Title: Plasma can save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.