धरणगावला राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे प्लॅस्टिक विल्हेवाट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 04:15 PM2019-12-09T16:15:13+5:302019-12-09T16:16:16+5:30

राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे सोमवारी प्लॅस्टिक वापरण्यावर निर्बंध आणण्यासाठी जनजागृती करून रॅली काढण्यात आली.

Plastic disposal campaign by Dhangaon National Student Army | धरणगावला राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे प्लॅस्टिक विल्हेवाट मोहीम

धरणगावला राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे प्लॅस्टिक विल्हेवाट मोहीम

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅलीबाजारपेठेतील प्लॅस्टिक कचरा केला गोळा अन् लावली विल्हेवाट

धरणगाव, जि.जळगाव : राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे सोमवारी प्लॅस्टिक वापरण्यावर निर्बंध आणण्यासाठी जनजागृती करून रॅली काढण्यात आली. तसेच प्लॅस्टिकची विल्हेवाटही लावण्यात आली.
राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे १ ते १५ डिसेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पंधरवड्यात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमानुसार येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पी. आर.हायस्कूलमधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यासाठी विद्यालयातून प्लॅस्टिक जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी, उपप्राचार्य डॉ.किशोर पाटील, उपमुख्याध्यापक संजय अमृतकर, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, यांच्या हस्ते करण्यात आले. साने पटांगणावर, कोट बाजार आवारात असलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. एकत्रित केलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, अन्य वस्तू यांना जाळून विल्हेवाट लावण्यात आली. भाजीबाजारात हा उपक्रम राबविण्यात आला. याच ठिकाणी मेजर अरुण वळवी, मुख्य कार्यक्रम अधिकारी डी.एस.पाटील यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिसरात असलेल्या नागरिकांना, व्यावसायिकाना प्लॅस्टिक वापरावर निर्बंध घालण्याचे आवाहनही केले.
या उपक्रमासाठी १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे कमांडिंग आॅफिसर कर्नल सत्यशील बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात सिनियर, ज्युनिअर डीव्हीजनमधील १५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
१८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीे प्रतिनिधी हेमा राम यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे, कॅडेट प्रमोद पाटील, परदेशी, ओम पाटील, प्रथमेश सोनार, कावेरी पाटील, तेजल कापडे यांनी परिश्रम घेतले. प्लॅस्टिक निर्मितीवर बंदी आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title: Plastic disposal campaign by Dhangaon National Student Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.