जळगाव : नातेवाईकांमधील वाद व पोलिसांनी पत्नीची तक्रार घेतली नसल्याची चिठ्ठी लिहून ती फेसबुकवर अपलोड करुन सुपडू दिनकर पाटील (३५,रा.कुºहाडदा, ता.जळगाव) या तरुणाने वावडदा शिवारात स्वत: च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, विष प्राशन करण्यापूर्वी त्याने मित्राला व्हिडीओकॉलन केला त्यामुळे तात्काळ दवाखान्यात दाखल करता आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे तीन वाजता सुपडू याने वावडदा शिवारातील शेतात जावून आत्महत्या करीत असल्याबाबत तसेच त्याला कोण कोण जबाबदार आहे याचा उल्लेख करुन चिठ्ठी लिहिली व ती फेसबुकवर अपलोड केली. तत्पूर्वी मित्राला व्हिडीओकॉल करुन मी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. मित्र व इतर नातेवाईकांनी शेतात धाव घेऊन त्याला देवकर आयुर्वेद रुग्णालयात पाठविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.सुपडूविरुध्द यापूर्वी गुन्हा दाखलसुपडू हा खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील रहिवाशी आहे. दहा वर्षापासून मेहुण्याच्या गावात कुºहाडदा येथे वास्तव्याला आहे. सहा महिन्यापूर्वी सुपडू याने कुºहाडदा गावात मेहुण्याच्या वडीलांवर कुºहाडीने हल्ला केला होता. त्यावेळी सुपडू याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. तेव्हापासून दोन्ही परिवारात तणावाचे वातावरण आहे. जागा व गुन्ह्यात पत्नीचे नाव टाकण्याच्या कारणावरुन हा वाद सुरु आले.काय आहे चिठ्ठीतसुपडू याने चिठ्ठीत मी आत्महत्या करीत आहे. कारण सर्वात मोठा गुन्हेगार वाल्मिक दौलत धनगर आणि त्याचा मुलगा तसेच अशोक रामचंद्र पाटील, अंबादास रामचंद्र पाटील, रामचंद्र शिवाजी पाटील,ज्योती अशोक पाटील, सुवर्णा अंबादास पाटील यांचा उल्लेख असून पत्नी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली असता, आधी तुझ्या पतीला घेऊन ये, मग तक्रार घेऊ असे सांगून तक्रार घेतली नाही, असे म्हटले आहे. यात माझ्या बहिणीची चूक नाही असाही उल्लेख आहे.
फेसबुकवर चिठ्ठी अपलोड करुन तरुणाने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:46 PM