भडगाव : पोलिस खात्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल ठाणे येथील क्राईम ब्रॅन्चला कार्यरत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोघांना नुकतेच गौरविण्यात आले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, ठाणे येथील ‘चेकमेट कंपनीवर पडलेल्या 11 कोटी रुपयांच्या तथाकथित दरोड्याचा े तपास जलद गतीने करुन सदर गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह तात्काळ ताब्यात घेतल्याच्या गौरवपुर्ण कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्यातील भडगांव तालुक्यातील जुवार्डी येथील रहिवासी आणि ठाणे येथे क्राईम ब्रॅन्चला पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले शिवाजीराव अमृत पाटील तसेच जिल्ह्यातील यावल येथील रहिवासी आणि ठाणे येथेच क्राईम ब्रॅन्चमध्ये ए.एस.आय.पदावर कार्यरत आसलेले राजेंद्र जोगी यांना नुकतेच महाराष्ट्र पोलिस संचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल राज्यात नव्हे तर देश पातळीवर जळगाव जिल्ह्यासह भडगांव तालुक्याचे नांव उंचावले आहे.
पोलीस खात्यातील दोघांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 3:21 PM
जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले
ठळक मुद्देठाणे येथील क्राईम ब्रॅन्चमध्ये केली उत्कृष्ट कामगिरी महाराष्ट्र पोलिस संचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरव