वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:35 PM2021-05-21T17:35:56+5:302021-05-21T17:36:30+5:30
साध्या गणवेशात पोलिसांनी सापळा रचला अन 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमळनेर : साध्या गणवेशात एका ट्रॅक्टरवर वाळू भरायला जात असल्याचे भासवून हिंगोणा शिवारात बोरी नदीत व इतरत्र अवैध वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. टया कारवाईत सुमारे 53 लाखाचा माल जप्त करून मालक व चालक अशा 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवी पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने 21 रोजी पहाटे पाचला
वाळू वाहतूक करणाऱ्यांनी ठिकठिकाणी ठेवलेल्या खबऱ्याना चकवा दिला. पारोळा रस्त्याने जाऊन एका खळ्यातील ट्रॅक्टरमालकाला विनंती करून त्या ट्रॅक्टरमध्ये साध्या गणवेशात पोलीस बसले. वाळू वाहतूक करायला चाललो आहोत, असे भासवून नदी पात्रात छापा टाकला. त्यात 7 लाख 10 हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 18 एएन 2313 मध्ये वाळू ट्रॅक्टरचालक शोएबखा मजीदखा रा.झामी चौक, मालक जमाल शेख रा.कसाली मोहल्ला, 7 लाख रुपये किमतीचे एमएच 40 एएल 1318 चालक दीपक देविदास सोनवणे रा.देवळी, मालक रोहित कंखरे रा.पैलाड, 7 लाख 5 हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 बीजी 8027 चालक सोमनाथ मधुकर सोनवणे, मालक आबा भोई, 7 लाख रुपये किमतीचे बिना नंबरचे ट्रॅक्टर चालक श्रीराम लहू पवार रा. मंगरूळ, मालक पपु रा. मंगरूळ, 7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 18 झेड 1998, चालक प्रवीण सुधाकर सोनवणे, मालक आकाश येवले रा.झामी चौक, 7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर एमएच 19 एएन 1318 , चालक अनिल राजू सोनवणे रा.रुबजी नगर, मालक रोहित कंखरे रा. पैलाड, 7 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर एमएच 19, एपी 6810 चालक व मालक मासुमखा भुऱ्या शब्बीरखा रा.अमळनेर यांना रंगेहाथ पकडले. या सर्वांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जवखेडा अंचालवाडी रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ यांना मांडळ येथील सुनील शांताराम भिल हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 सीव्ही 9768मध्ये अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. त्याचा मालक वाघोदे येथील राहुल पाटील असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचे ट्रॅक्टर व वाळू जप्त करून दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 53 लाख 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.