कंजरवाड्यात पोलिसांची वॉश आऊट मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:30+5:302021-06-24T04:12:30+5:30
जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी कंजरवाडा भागात वॉश आऊट मोहीम राबविली. यात गावठी दारुच्या भट्ट्या फोडण्यात आल्या असून दारू ...
जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी कंजरवाडा भागात वॉश आऊट मोहीम राबविली. यात गावठी दारुच्या भट्ट्या फोडण्यात आल्या असून दारू व रसायन असा १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. दारू तयार करून विक्री करणाऱ्या महिलांसह दहा जणांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंजरवाडा भागात वॉश आऊट मोहीम राबविण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथकाने कंजरवाडा परिसरातील गावठी दारुच्या अड्ड्यावर सकाळीच छापा टाकण्यात आला. यात पथकाने राजेश वसंत माचरे (८०) संजय बट्टु नेतलेकर (६६), उमेश रमालाल तांबट (३०, रा. कासमवाडी), राजेश गणपत भाट (५२, रा. नवलकॉलनी), वनाबाई देवसिंग बाटुंगे (७५),नैनीता मंगल गुमाने (४९), विमलबाई शंकर बागडे (५५, तिन्ही रा.जाखनीनगर), इंदुबाई उदयसिंग बागडे ( ५० रा. अंध शाळेच्या पाठीमागे), उमेश मायकल नेतलेकर (२१) व बेबीबाई हिरा नेतले (६३ रा. संजय गांधी नगर) यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.