कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:12 AM2021-05-03T04:12:03+5:302021-05-03T04:12:03+5:30

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व ...

Political allegations during the Corona period - transplant tissue | कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

कोरोना काळात राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत

Next

कोरोनाने कहर केलेला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या नियोजनावर व राज्य शासनावर केलेल्या टीकेनंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना ऊत आला आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख मिळविलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे ऐन कोरोना काळात स्वत:च्या मतदार संघातील व जिल्ह्यातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी थांबण्याऐवजी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्याआधी त्यांनी काही आढावा घेतला होता. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. तेथून परतल्यावर मात्र त्यांनी कोरोना परिस्थिती व नियोजनाचा आढावा घेत नियोजन व्यवस्थित नसल्याची टीका केली होती. तसेच राज्य शासनावरही टीका केली होती. त्याला विरोधकांकडूनही तसेच उत्तर मिळाले. पहिल्यांदा खडसे यांनी टीकास्त्र सोडले. त्यामुळे खडसे-महाजन असे आरोप - प्रत्यारोप सुरू झाले. वादाची पातळीही प्रथमच कधी नव्हे इतकी खालावलेली दिसली. तर इतर विरोधकांनीही महाजन यांनी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका सुरू केली. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाजन यांना धारेवर धरत ते अथवा चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना महापालिकेला नियोजनच्या निधीतून किती मदत केली? असा सवाल केला आहे. महापालिका निवडणुकीच्यावेळी जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करू, जळगाव शहरासाठी १०० कोटी आणू, २०० कोटी आणू अशी आश्वासने गिरीश महाजन यांनी दिली. तेव्हा तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे खास होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आता साहजिकच महाजन यावर पटलवार करणार, हे उघड आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करावी लागत असताना त्यांना मदत करण्यासाठी सरसावण्याऐवजी राजकीय नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी आमदार, खासदारांनी स्वत: कोविड सेंटर सुरू केल्याचे, तसेच नागरिकांना शक्य ती मदत केल्याचे दिसत असताना जिल्ह्यात मात्र राजकीय मंडळी मदतीसाठी अशी पुढे आलेली दिसली नाहीत. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. मात्र जेव्हा लोकांचे हाल होऊन सहनशीलता संपत यायला लागली, तेव्हा राजकारण्यांना जाग आली. मग एप्रिल महिन्यात हेल्पलाईनसारखे प्रयोग सुरू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना असून राजकारण न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी शक्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Political allegations during the Corona period - transplant tissue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.