नशिराबादला राजकीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:50+5:302021-07-26T04:15:50+5:30
नशिराबाद : येथे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवत विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसायला सुरुवात केली ...
नशिराबाद : येथे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवत विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचा विस्तार, शाखा ओपनिंग नियोजन, पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आदी कामांना गती आल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून नशिराबाद ओळखले जाते. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून नशिराबादची पहिल्यापासूनच ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणावर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादमध्ये विविध विकास कामे करून नगर परिषदेसाठी पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर केला आहे. दरम्यान, नुकतीच ग्रामपंचायत संपुष्टात आल्याने व नगर परिषद जाहीर झाल्याने सर्वांचे लक्ष आता निवडणुकीकडे लागले आहे. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर विविध राजकीय पक्ष शाखांचे विस्तारीकरणही होत आहे. गाव मोठे असले तरी शाखा विस्तार होत असल्याने राजकीय स्पर्धा सुरू आहेत. जिल्ह्यात राजकीय गाव म्हणून नशिराबादची ओळख आहे. पहिला नगराध्यक्ष आमच्या पक्षाचा अशी चुरस सुरू आहे. त्या निमित्ताने थोडी फार जनहिताची कामे होत आहेत. प्रत्येक ज्येष्ठ कार्यकर्ता आपल्या पक्षात कार्यकर्ते वाढावेत म्हणून प्रयत्नशील आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीबाबतची कार्यवाही अद्याप सुरू झाली नसली तरी गावांमध्ये आगामी निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे.