जामनेर : राज्यात सुमारे ९० लाख गोरबंजारा समाज असून, जवळपास ३५ ते ४० मतदारसंघात आमदार कोण असेल हे ठरविण्याची ताकद समाजात आहे. मात्र, त्यासाठी राजकीय मतभेद विसरून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार संजय राठोड यांनी सोमवारी दुपारी येथील मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात केले.
राठोड यांचे आगमन होताच त्यांचे समाजबांधवांनी सवाद्य मिरवणुकीने स्वागत केले. भुसावळ चौफुली व नगरपालिका चौकात त्यांचा सत्कार करण्यात आला. राजकारणासाठी राजकारण न करता समाजकारण केले. आजही तांडा वस्तीवरील समाजबांधव अडचणीचे जीवन जगत आहेत. मूलभूत सुविधा, अंगणवाडी व शिक्षणाची सोय नाही, असे राठोड यांनी सांगितले.
यावेळी मोरसिंग राठोड, डॉ. ऐश्वर्या राठोड, प्रा. सी.के. पवार, रमेश नाईक, नामदेव चव्हाण, कांतिलाल नाईक, सुभाष जाधव, गोपाळ नाईक, राजेश नाईक, दीपक चव्हाण, मूलचंद नाईक, दलसिंग नाईक, भारत पवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
संचलन लालचंद चव्हाण यांनी केले. मूलचंद नाईक यांनी आभार मानले.
200721\20jal_3_20072021_12.jpg
जामनेर येथील समाज बांधवांच्या मेळाव्यात बोलताना आमदार संजय राठोड, सोबत मोरसिंग राठोड, प्रा. सी. के. पवार आदी.