प्री-पीएच.डी. कोर्स वर्क कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:38+5:302021-02-27T04:19:38+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर आयोजित केलेल्या प्री-पीएच.डी. कोर्स वर्क ऑनलाईन कार्यशाळेत ...

Pre-Ph.D. Participation of 900 research students in course work workshop | प्री-पीएच.डी. कोर्स वर्क कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्री-पीएच.डी. कोर्स वर्क कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर आयोजित केलेल्या प्री-पीएच.डी. कोर्स वर्क ऑनलाईन कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.

विद्यापीठाने पेट-२०१९ च्या अनुषंगाने तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्री-पीएच.डी. कोर्स वर्क कार्यशाळेचे आठवडाभरासाठी आयोजन केले होते. यापूर्वी प्रत्यक्ष कार्यशाळा घेण्यात आल्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी ही कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑनलाईन कोर्स वर्क शाळेचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता प्रा.ए. बी. चौधरी व ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. समन्वयक म्हणून प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य पी.एम.पवार, प्राचार्य प्रदीपकुमार छाजेड, प्राचार्य अशोक राणे यांच्यासह सहयोगी अधिष्ठाता प्रा.संजय शेखावत, प्राचार्य व्ही.आर.पाटील व प्राचार्य बी. युवाकुमार रेड्डी यांनी काम पाहिले. तांत्रिक समन्वयक म्हणून डॉ .समीर नारखेडे, डॉ. मनोज पाटील व दाऊदी हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली होती. या ऑनलाईन कार्यशाळेत ९०० संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ९१ विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Pre-Ph.D. Participation of 900 research students in course work workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.