पहूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांची सुरक्षा ‘रामभरोसे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:41 PM2020-03-30T15:41:55+5:302020-03-30T15:43:27+5:30
पहूर, ता. जामनेर , जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात ...
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा द्यावी लागत आहे. तसेच खासगी डॉक्टरही याला अपवाद नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांसह खासगी खासगी डॉक्टरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व सरकार गंभीरपणे उपाययोजना करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेपैकी वैद्यकीय सेवा प्रमुख मानली जाते. या सेवेची सुरक्षा धोक्यात आली तर हे भयंकर संकट मानले जाईल. तेच पहूर ग्रामीण रुग्णालय व खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेवरून समोर आले आहे.
येथील वैद्यकीय अधिकाºयांसह परिचारिका, अधिपरिचरिचारक व कर्मचारी रुग्ण सेवा पुरवित आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य विभागाने त्यांना सुरक्षा किट देणे बंधनकारक आहे. रुग्णाचा थेट संपर्क डॉक्टरांशी येत आहे. फक्त हँडग्लोज वापरून डॉक्टर प्रत्यक्ष तपासणी करीत आहे. एखाद्या रूग्णाला डॉक्टरांनी हात लावला नाही तर यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मात्र पंधरा दिवस उलटले असून अद्यापही सुरक्षा किटविना डॉक्टर सेवा देत आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझर, स्पिरीट हात धुण्यासाठी नसून नाईलाजाने साबणाने हात धुत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा जीव वाचविणाºया डॉक्टरांसाठीच धोक्यात टाकणारा ठरू शकतो.
संशयाने नागरिक भीतीच्या छायेत
मुंबई व पुणे व अन्य बाहेर गावावरून आले आहे. त्यांच्याजवळ जावू नका, त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. ही मानसिकता नागरिकांची पहावयास मिळत आहे.
सुरक्षा किट मिळण्यासाठी शासनस्तरावर मागणी केली आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर उपलब्ध नसल्याने आमच्यापर्यंत पोहोचली नाही. तरीही आमच्या स्तरावर सॅनिटायझर व मास लावून सुरक्षा घेतली जात आहे.
-डॉ.हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, पहूर
शासनाकडून सुरक्षा किट मिळाले नाही व बाजारातही उपलब्ध नाही. सॅनिटायझर मिळत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने रूग्णसेवा बंद होती. मात्र माणुसकीच्या नात्याने स्वत:चा व परिवाराचा जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा पुरवित आहोत. रुग्ण तपासणीवरून रुग्णाचे नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमकीचे प्रसंग समोर येत आहे. नागरिकांनी डॉक्टरांना समजून घेणे आवश्यक आहे. -डॉ.जितेंद्र घोंगडे, खासगी डॉक्टर, पहूर