प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:57 PM2020-04-10T23:57:12+5:302020-04-10T23:59:02+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मेहेरगावाविषयी लिहिताहेत अमळनेर येथील ‘लोकमत’चे वार्ताहर डिगंबर महाले...

Progress and the Motivation for Duty: Mehergaon | प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव

प्रगती नि कर्तबगारीची मोहोर : मेहेरगाव

googlenewsNext

अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घेऊन गावाच्या विकासाचा संकल्प केला तर काय विकास घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण मेहेरगावने जळगाव जिल्ह्यात निर्माण केले आहे.
९२२ लोकसंख्या असलेल्या अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव या गावात शुद्ध आर. ओ. पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था, मोफत पिठाची गिरणी, सुसज्ज अभ्यासिका, व्यायामशाळा, गावातील रस्त्यांचे १०० टक्के काँक्रीटीकरण, संपूर्ण गावात एल.इ.डी. दिव्यांची व्यवस्था, १०० टक्के भूमिगत गटारी, प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर व अधिकृत वीज जोडणी, चौकाचौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, डिजिटल अंगणवाडी, पेपरलेस ग्रामपंचायत, ९० टक्के ग्रामस्थांकडे व्यक्तिगत शौचालय, सात सार्वजनिक शौचालये, जि. प.शाळा, संपूर्ण गाव व्यसनमुक्त एवढेच नव्हे आता हे गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. लवकरच सौर ऊर्जेच्या साहाय्याने सर्वांना मोफत गरम पाणी मिळणार आहे. पिठाची गिरणी व शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणेसाठीही लवकरच सौर ऊर्जा साधने बसविली जाणार आहेत.
याचा एकूणच परिपाक म्हणून १९१७-१८ मध्ये स्मार्ट गाव स्पर्धेत गावाने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यापोटी गावाला १० लाख रुपये मिळाले होते. संत गाडगेबाबा अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम व विभागात चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. त्यापोटी गावाला सहा लाख ३० हजार रुपये मिळाले होते. पाणी फाउंडेशन स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यापोटी गावाला चार लाख रुपये मिळाले होते. आता समृध्द ग्राम स्पर्धेसाठीही गावाने सहभागी होऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून गाव आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी ग्रामसभेत संपूर्ण गावाने शपथ घेतली आहे.
मेहेरगाव लवकरच राज्यभर चर्चेत
मेहेरगाव येथील विकासाची गाथा आज प्रत्यक्ष पाहता आली. राज्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मेहेरगावाच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात गावातील सर्व माता भगिनींचे बँक खाते उघडून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी खासदार उन्मेष पाटील स्वत: प्रयत्न करणार आहेत.
छाया शरद पाटील गावच्या सरपंच आहेत. बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. पती शरद पाटील व ग्रामस्थांची त्यांना भक्कम साथ आहे. गावाच्या भरभराटीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
-डिगंबर महाले, अमळनेर

Web Title: Progress and the Motivation for Duty: Mehergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.