जि.प.च्या ५०० शाळांना संरक्षण भिंती उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:41+5:302021-08-15T04:19:41+5:30
पाळधी (ता. धरणगाव) : जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव तालुक्यात घेण्यात आला आहे. राज्य ...
पाळधी (ता. धरणगाव) : जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव तालुक्यात घेण्यात आला आहे. राज्य पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५००पेक्षा अधिक शाळांना १४ व्या वित्त आयोगातून संरक्षक भिंती बांधण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केली.
पाळधी खुर्द गावातील फुलेनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली. त्याचे लोकार्पण शनिवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भिंतीचे काम मनरेगा, जिल्हा नियोजन समिती आणि चौदावा वित्त आयोग योजनेंतर्गत केले गेले. यासाठी १० लक्ष ४७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी शाळेच्या आवारात गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक शरद पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले, तर केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजू पाटील, दिलीप पाटील, दामू पाटील, संजय पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सरपंच चंद्रकांत माळी, प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी पाठक, मुख्याध्यापक शरद पाटील, सचिन सरकटे, अरविंद मानकरी, संदीप पवार, नाना पाटील, बापू मोरे उपस्थित होते.