आयएमएच्या भारत यात्रेत ‘एनएमसी’ विधेयकाला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:48 PM2018-03-17T12:48:13+5:302018-03-17T12:48:13+5:30

जळगावात रॅलीने वेधले लक्ष

Protest against the 'NMC' Bill in IMA's India Yatra | आयएमएच्या भारत यात्रेत ‘एनएमसी’ विधेयकाला कडाडून विरोध

आयएमएच्या भारत यात्रेत ‘एनएमसी’ विधेयकाला कडाडून विरोध

Next
ठळक मुद्देडॉक्टर व वैद्यकिय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागनिषेधाच्या घोषणांनी दणाणला परिसर

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ - राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (नॅशनल मेडिकल कमिशन) विधेयक जनता, गोरगरिब व्यक्ती यांच्या विरोधातील असून सामान्य जनतेच्या आरोग्यास घातक आहे. हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे व रुग्णांचा वैद्यकीय खर्च वाढविणारे असल्यामुळे आयएमएचा याला विरोध असून त्याविरोधात आवाज उठविण्यात आल्याचे आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजय कुमार यांनी सांगितले. दिल्लीत होणाऱ्या डॉक्टर्स महापंचायतमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकाला विरोध करणारी आयएमएची भारत यात्रा शुक्रवारी जळगावात पोहचली. त्यावेळी समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना डॉ. कुमार बोलत होते. याप्रसंगी आयएमएचे राज्यसचिव डॉ.पार्थिव संघवी, डॉ.निसार शेख, जळगावचे अध्यक्ष डॉ.विश्वेश अग्रवाल, राज्याचे सहसचिव व जळगावचे सचिव डॉ.राजेश पाटील आदी उपस्थित होते.
सध्या वैद्यकीय व्यवसाय बिकट परिस्थितीतून जात असून वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत अनेक प्रस्ताव तसेच शासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य रुग्णांवर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे. या विधेयकामुळे वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा खर्चिक होणार असल्याचे डॉ.पार्थिव संघवी यांनी सांगितले.
विधेयकामुळे क्रॉसपॅथी प्रॅक्टीसला चालना
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (नॅशनल मेडिकल कमिशन) या विधेयकामुळे क्रॉसपॅथी प्रॅक्टीसला चालना मिळेल, वैद्यकीय शिक्षण फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होईल, असे सांगून डॉ.निसार शेख यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमोद सोळुंके, शुभम भोलाणे, पृथ्वीराज काळे या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा खेळखंडोबा करणाºया विधेयकाचा मनोगतातून निषेध व्यक्त केला.
जनतेला सुरक्षित आरोग्य द्या
प्रास्ताविकात डॉ.राजेश पाटील यांनी अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच आरोग्यही जीवनावश्यक बाब आहे, असे नमूद करुन शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन जनतेला सुरक्षित आरोग्य दिले पाहिजे. मात्र सरकार असे चुकीचे विधेयक आणत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निषेधाच्या घोषणांनी दणाणला परिसर
समारोप कार्यक्रमापूर्वी संध्याकाळी जळगावात यात्रेचा आयएमए सभागृहापासून प्रारंभ होऊन स्टेशनरोड, नेहरु चौक, शास्त्री टॉवर चौक, जिल्हा परिषद चौक मार्गे येऊन आयएमए सभागृहात समारोप झाला. या यात्रेत आयएमएचे सदस्य व शहरातील बहुसंख्य डॉक्टर्स, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, परिचारिका, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेत, घोषणांच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात येत होता. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Protest against the 'NMC' Bill in IMA's India Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.