बिजापूर येथील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:11+5:302021-04-09T04:17:11+5:30
जळगाव : छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात २२ भारतीय जवान शहीद झाले व अनेक जखमी ...
जळगाव : छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात २२ भारतीय जवान शहीद झाले व अनेक जखमी जवान उपचार घेत आहेत, या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी नक्षलवादी विरोधी फलक घेऊन निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी आदेश पाटील, हर्षल तांबट, चिराग तायडे, मयूर माळी, मनीष चव्हाण, रितेश महाजन,आकाश पाटील, अंकित चव्हाण, दुर्गेश वर्मा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
======================
नुतनीकरणासाठी प्रस्ताव सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संलग्नीकरणाच्या नुतनीकरणासाठी विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक तपासणी समितीकडून तपासणी होवू न शकल्यामुळे विद्यापीठाने आवश्यक माहिती महाविद्यालयांकडून मागविली आहे. १६ एप्रिलपर्यंत माहिती पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.