लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काेविड मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांनी फायर, इलेक्ट्रीक, ऑक्सिजन, ऑडिट करण्याच्या सूचना वारंवार देऊनही या बाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नसून दोन दिवसात या सर्व खासगी रुग्णांलयांनी हे ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा आपल्या आरोग्य संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिला आहे.
राज्यात विविध ठिकाणी रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोविड मान्यताप्राप्त सर्व रुग्णालयांनी फायर सेफ्टी ऑडिट करून प्रेाव्हिजन एनओसी आणि अंतीम एनओसी प्राप्त करून जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सादर करावे, अशा सूचना वारंवार देऊनही एनओसी या कार्यालयासत अप्राप्त आहेत. दोन दिवसात हे एनओसी प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा मान्यता रद्द करण्यात येईल व आरोग्य संस्थेला आग लागल्यास अथवा इतर दुर्घटना झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.