इंग्रजी शाळांना देखभाल दुरुस्ती अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:02+5:302021-07-11T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शाळा सुरु करण्याच्या ७ जुलैच्या सुधारीत राज्य सरकारच्या आदेशात राज्यातील ग्रामीण भागातील आठवी ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शाळा सुरु करण्याच्या ७ जुलैच्या सुधारीत राज्य सरकारच्या आदेशात राज्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा टप्याटप्प्याने सुरु होणार आहेत. अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत देखभाल दुरुस्तीसाठी पटावर आधारित अनुदान देण्यात येणार असून त्याच धर्तीवर इंग्रजी शाळानांही अनुदान द्यावे, अशी मागणी इंग्रजी शाळांची संघटना असणाऱ्या ‘मेस्टा’ने केली आहे.
कोरोना कालावधीत शाळा बंद होत्या. त्या नव्याने सुरु करण्यासाठी शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून इंग्रजी शाळा बंद आहेत. त्यामुळे फी येणे बंद असून शासन फी घेण्यास प्रतिबंध करीत आहे. त्यामुळे पालक फी भरत नाहीत. त्यामुळे इंग्रजी शाळांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशा सुरु करायच्या? हा प्रश्न संस्था चालकांपुढे आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत देखभाल दुरुस्ती अनुदान द्यावे, अशी मागणी मेस्टा संघटनेने राज्य सरकारला केल्याचे जिल्हाध्यक्ष नरेश पी. चौधरी यांनी केली आहे.