दोन लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावून पळणाऱ्याला पब्लिक मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:02+5:302021-02-21T04:30:02+5:30

जळगाव : बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन रस्त्याने चालत असलेले धनराज प्रेमराज पुरोहित (६०, रा.शनी पेठ) यांच्या ...

Public beating of a runner who snatched a bag containing two lakh cash | दोन लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावून पळणाऱ्याला पब्लिक मार

दोन लाखाची रोकड असलेली बॅग हिसकावून पळणाऱ्याला पब्लिक मार

Next

जळगाव : बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन रस्त्याने चालत असलेले धनराज प्रेमराज पुरोहित (६०, रा.शनी पेठ) यांच्या हातातील बॅग मागून दुचाकीने आलेल्या चोरट्याने लांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅग घट्ट पकडून ठेवल्याने चोरटा दुचाकीवरुन खाली पडला अन‌् त्याचवेळी जमावाने त्याला बेदम चोपून काढले, त्यात तो जागेवरच बेशुध्द पडला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता काव्यरत्नावली चौकाजवळ घडली. राहूल उत्तम चौधरी (वय २५,रा.मांडकी, ता.भडगाव) असे संशयिताचे नाव असून त्याला व पुरोहित या दोघांना पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणले तेथून चौधरी याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी पेठेत राहणारे धनराज प्रेमराज पुरोहित यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता ते काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत व्यवसायासाठी लागणारे दोन लाख रुपये काढायला गेले होते. १ वाजता ही रक्कम काढून बॅगेत ठेवली. त्यानंतर आकाशवाणी चौकाच्या दिशेने ते चालत येत असतानाच जनता बँकेच्या अलीकडे मागून दुचाकीने आलेल्या राहूल चौधरी यांनी ही बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरोहित यांनी समयसूचकता दाखवून बॅग घट्ट पकडली, त्यामुळे ते ओढले जावून खाली पडले तर त्यांच्यासोबतच राहूल हा देखील दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी पुरोहित यांनी चोर...चोर असा अशी आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पुरोहित यांना सावरत चौधरी याला झोडपून काढले. गर्दीतूनच काही जणांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली, तोपर्यंत चौधरी याला पकडून ठेवण्यात आले.

बेशुध्दावस्थेत आणला पोलीस ठाण्यात

जमावाने त्याला इतकी मारहाण केली की तो जागेवरच बेशुध्द पडला. सहायक पोलीस निरीक्षक बिरारी व सहकाऱ्यांनी त्याला पोलीस वाहनात टाकले तर पुरोहित यांनाही पोलीस स्टेशनला आणले. या घटनेत पुरोहित यांच्या पायालाही दुखापत झाली. चौधरी याला पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी स्वत:च जिल्हा रुग्णालयात आणले.

नोकरी नसल्याने चोरीचा मार्ग

रुग्णालयात आणल्यावर उपचार झाल्यानंतर पोलिसांनी चौधरी याची चौकशी केली असता, आपण सुशिक्षीत बेरोजगार आहोत. जळगाव शहरात कामधंदा शोधण्यासाठी आलो आहे. काम न मिळाल्याने चोरीचा मार्ग निवडला असे त्याने सांगितले. दरम्यान, त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीची नंबर प्लेट त्याने उलटी केली होती व ती कोरी होती. उलट्या बाजूने एम.एच.१९ सी.क्यू.५००७ असा क्रमांक असून त्यावर संघर्ष असे नाव लिहिले आहे तर पुढे शिव असे नाव आहे. क्रमांकावरुन ही दुचाकी शिवाजी नगरातील असल्याचे समजले.

खिशात आढळले सैन्याच्या गणवेशाचे कार्ड

पोलिसांनी चौधरी याची अंगझडती घेतली असता, त्यात वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, पाकीट व सैन्य दलाचा गणवेश असलेले ओळखपत्र आढळले. त्यावर राहूल उत्तम चौधरी, ट्रेड टँकमॅन, सेंटर इंजिनियर अरेमोर्ड व वर्कशॉप अहमदनगर असा उल्लेख आहे. हे ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आहे.

Web Title: Public beating of a runner who snatched a bag containing two lakh cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.