चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:23 AM2019-12-21T00:23:42+5:302019-12-21T00:25:26+5:30

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

A raid on two gambling establishments named after the forty-fifth social club | चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी

चाळीसगावी सोशल क्लबच्या नावावर चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर धाडी

Next
ठळक मुद्दे५९ जुगाऱ्यांना अटकएक लाख ४६ हजार रुपये हस्तगतचाळीसगाव शहरात खळबळ

चाळीसगाव, जि.जळगाव : सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले. दोन महिन्यांपूर्वी याच सोशल क्लबवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली होती. मात्र गुरुवारी पुन्हा धाडी टाकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दूध सागर मार्ग आणि बसस्थानक परिसरात सोशल क्लब नावाखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ या वेळात अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्या पथकाने धाडी घातल्या. यात चाळीसगावसह, औरंगाबाद, उत्तर प्रदेश, बिहार, कन्नड, मालेगाव, मुंबई, ठाणे येथील जुगारी आढळून आले. त्यांना अटक करून नंतर जामिनावर मुक्तता करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.
बसस्थानक परिसरात असणाºया लकी व्यापारी संकुलातील मागील भागात पश्चिम दिशेला असणाºया एम स्पोर्ट जळगाव उपशाखा चाळीसगाव या क्रीडा संस्थेच्या बंद खोलीत संजय विश्राम राठोड हा जुगार अड्डा चालवितो, असे पोलिसांना समजल्यावर रात्री साडेसात वाजता येथे पथकाने छापा मारला. या ठिकाणी ४८ जुगारी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १४ हजार रुपये रोख व अंगझडती घेतली असता ९६ हजार रुपये मिळून आले.
दुसरी कारवाई दूध सागर मार्ग परिसरात रात्री आठ वाजता करण्यात आली. येथे भारतीय क्रीडा संस्था जळगाव उपशाखा चाळीसगाव अशा नावाने जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपये यासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
चाळीसगाव शहर पोलिसात दोन घटनेचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून, लकी कॉम्प्लेक्समधील घटनेचा गुन्हा पो.हे.कॉ.बापूराव भोसले यांच्या फिर्यादीवरून, तर डेअरी भागातील घटनेत पोलीस नाईक गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहे.

Web Title: A raid on two gambling establishments named after the forty-fifth social club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.