रेमन मॅगेसेस पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा म्हणतात... हो मी मराठीत शिकले, याचा मला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:08 AM2020-02-24T01:08:44+5:302020-02-24T01:13:36+5:30

मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत रेमन मॅगेसेस पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा... ‘हो मी मराठीत शिकले, याचा मला अभिमान’

Ramon Mages Award Winner Neelima Mishra says ... Yes, I am proud that I learned in Marathi | रेमन मॅगेसेस पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा म्हणतात... हो मी मराठीत शिकले, याचा मला अभिमान

रेमन मॅगेसेस पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा म्हणतात... हो मी मराठीत शिकले, याचा मला अभिमान

googlenewsNext

मराठी भाषा आत्मविश्वास तर देतेच. सोबत अस्तित्वाला धारही आणते. स्वत:चं अस्तित्व, मग ते राष्ट्रभक्ती असू देत किंवा काही, एक बाणेदारपणा यामध्ये मराठी भाषा आणते. आम्ही हिंदी भाषिक आहोत, मात्र एखादा विचार ठाम मांडायचा असेल, तर त्यासाठी माझी मराठीची मला साथ मिळते. मला परखडपणे विचार मांडायचे असतील आणि ठाम असलेले शब्द ताकद असलेले शब्दांची जोड मला मराठीत येते. कर्तव्य जबाबदारी, अधिकार, विचार, संकल्पना हे सर्व ताकदीने बोलण्यासाठी माझी मराठीतले तोलामोलाचे शब्द माझ्या पुढे देत असते. इंग्रजी या विषयाने मला न्यूनगंड येते. आत्ता मराठी भाषेविषयी लिहिताना मला वाटते की, इंग्रजीचा न्यूनगंड महत्वाचा की मराठीचा अभिमान? मराठीचा अभिमान उराशी बाळगून इंग्रजीचा न्यूनगंड झुगारून लावण्याचा बळ मला मिळते. अहो, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शिकलेले आम्ही विद्यार्थी, आमच्या पूर्वीचे विद्यार्थी कुठे कमी पडले? भाषेची अडचण कुठे कुणाला आली नाही. आज मराठीत शिकलेली मुलं जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला आढळतील. आम्ही घरात हिंदी बोलायचो, एखादा विचार मला जर परखड मांडायचं असल तर मी आईशी मराठीतच बोले.
मराठी अमृताहूनही गोड आहे, प्रखर आहे, बाणेदार आहे. ह्या मराठीचा मला सार्थ अभिमान आहे.
-नीलिमा मिश्रा, पारोळा, जि.जळगाव
(शब्दांकन : रावसाहेब भोसले)

Web Title: Ramon Mages Award Winner Neelima Mishra says ... Yes, I am proud that I learned in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.