खान्देशातील प्रति पंढरपूर शेंदुर्णीत भगवान त्रिविक्रमाचा रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:24 PM2017-11-03T19:24:22+5:302017-11-03T19:29:29+5:30

खान्देशातील प्रति पंढरपूर असलेल्या शेंदुर्णी येथे शुक्रवारी भगवान त्रिविक्रम, श्री संत कडोजी महाराज यांच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात रथोत्सव उत्साहात पार पडला.

Rathosava of Lord Trivikrama in shendurani | खान्देशातील प्रति पंढरपूर शेंदुर्णीत भगवान त्रिविक्रमाचा रथोत्सव

खान्देशातील प्रति पंढरपूर शेंदुर्णीत भगवान त्रिविक्रमाचा रथोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देरथोत्सवाचे हे २७३ वे वर्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली रथाची पुजाभाविक भक्तांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी, दि.३ : खान्देशातील प्रति पंढरपूर असलेल्या शेंदुर्णी येथे शुक्रवारी भगवान त्रिविक्रम, श्री संत कडोजी महाराज यांच्या जयघोषात व भक्तीमय वातावरणात रथोत्सव उत्साहात पार पडला.
रथोत्सवाचे हे २७३ वे वर्ष आहे. प्रारंभी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रथाची पुजा करण्यात आली. त्यानंतर महावीर मार्ग, श्री दत्त चौक, नुराणी मशिद, गांधी चौक मार्गे रथ मूळ जागी परतला. रथ सर्वात पुढे टफ, फटाक्यांची आतषबाजी, पुरुष भजनी मंडळ, श्रीकृष्ण राधा, कलश धारी महिला, बैलगाडीवर राम सिता, दुर्गा देवी सह विविध सजीव आरास सादर केले होते. सनई चौघडा पारंपारीक मंगल वाद्य ही होते. भालदार, चोपदार विजय सोनार, गजानन सुतार सर्व बारा बलुतेदारांचा परंपरा, सांस्कृतीक व ऐतिहासीक परंपरा जपत उत्साहात साजरा. यावेळी परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Web Title: Rathosava of Lord Trivikrama in shendurani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.