उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची २३ ऑगस्टपासून फेरपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:49+5:302021-08-15T04:19:49+5:30
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ...
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
८ जून २०२१ पासून ३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या https://nmu.unionline.in या लिंकवर जाऊन परीक्षा द्यावयाची आहे.
बहिस्थ लेखी परीक्षांमधील जे विद्यार्थी बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित राहिले किंवा नापास झाले असतील अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलविता २१ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करून त्यांचे गुण २३ ऑगस्टपर्यंत विद्यापीठात पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांनी ८ जून ते ३१ जुलैपर्यंत झालेल्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर केले असलेल्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेला प्रविष्ठ होता येईल. याबाबत काही अडचणी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. किशोर पवार यांनी दिली.