धरणगाव : तालुक्यात कोरोनाने थैमान घालणे सुरुच ठेवले असून, १४ आॅगस्ट रोजी ५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठशे पार झाली आहे, तर चार दिवसात १९४ रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासन थक्क झाले आहे.धरणगाव तालुक्यात १४ रोजी आढळलेल्या एकूण ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील चिंतामण मोरया परिसरातील ०४ रुग्णांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील पाळधी बुद्रूक १६ , पाळधी खुर्द ३, रोटवद-४, वराड खुर्द १३, वरड बुद्रूक २, वाघळूद बुद्रूक ४ तसेच बांभोरी प्र.चा., चमगाव, बाभळे, चोरगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने आजपावेतोची एकूण रुग्णसंख्या ८५५ झाली आहे. यापैकी ३४ रुग्ण मयत झाले आहेत. ५६७ रुग्ण बरे होऊन त्यांची घर वापसी झाली आहे. आता २५४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली.
धरणगाव तालुक्यात रेकार्ड ब्रेक-१९४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 9:55 PM
धरणगाव : तालुक्यात कोरोनाने थैमान घालणे सुरुच ठेवले असून, १४ आॅगस्ट रोजी ५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तालुक्यात एकूण ...
ठळक मुद्देअर्धशतक रुग्ण पॉझिटिव्हरुग्णांची वाढ झाल्याने प्रशासन थक्क