मुक्ताईच्या कुशीत आठ पट्टेदार वाघांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:27+5:302021-07-29T04:17:27+5:30

मतीन शेख मुक्ताईगर, जि. जळगाव : खानदेशातील मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा-वढोदा वनपरिक्षेत्रतील वाघांचा अधिवास व संचार गौरवशाली ठरला आहे. ...

Record of eight leopard tigers in Muktai Kushi | मुक्ताईच्या कुशीत आठ पट्टेदार वाघांची नोंद

मुक्ताईच्या कुशीत आठ पट्टेदार वाघांची नोंद

Next

मतीन शेख

मुक्ताईगर, जि. जळगाव : खानदेशातील मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा-वढोदा वनपरिक्षेत्रतील वाघांचा अधिवास व संचार गौरवशाली ठरला आहे. २० वर्षांपूर्वी या जंगलात वाघ पहिल्यांदा दिसून आला होता. आता तिथे पट्टेदार वाघांची संख्या तब्बल आठ झाली आहे. पट्टेदार वाघांना अधिवासासाठी भावलेल्या या जंगलात दोन वेळेस वाघिणीचे प्रजनन झाल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे पट्टेदार वाघांचे अधिवासच नव्हे तर प्रजनन क्षेत्राची मोहर येथे उमटली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळामुळे नागरिकांचा वनक्षेत्रात हस्तक्षेप पुरता नियंत्रणात आला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक आणि रहदारीच्या वाहनांवर आलेले निर्बंध वाघाच्या मुक्त संचारासाठी अधिक पोषक ठरले. या काळात वन गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना स्वच्छंदी बागडणारे तर कधी शिकार करणारे पट्टेदार वाघ प्रत्यक्ष किंवा ट्रॅप कॅमेऱ्याच्या नजरेतून पहायला मिळाले आहेत.

गावकरी बनले व्याघ्र संवर्धक

वाघाच्या अधिवासाने वनक्षेत्राला लागून असलेली गावे जागृत आहेत. वाघाच्या संवर्धनासाठी वेळप्रसंगी आपल्या शेती उत्पन्नावर पाणी सोडण्याचे धाडस बाळगणाऱ्या या भागातील नागरिकांना वाघाच्या संवर्धनाचा अभिमान आहे. डोलारखेडा गावाने वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी गमावला, काही घटनांमध्ये शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला केला. उन्हाळ्यात वाघ पूर्णा नदी पात्राकडे येत असतात अशा वेळेस येथील शेतपिकांचा नुकसान सहन करण्यापाठोपाठ जिवावर बेतल्यानंतरही येथील ग्रामस्थांनी व आपल्या दिनचर्येचे रूपरेषा बदलवून व्याघ्र संवर्धनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.

लाल फितीत अडकले प्रकल्प

पट्टेदार वाघ या जंगलात रूळले आहेत. अवघ्या तीन किलोमीटर क्षेत्रात एकापेक्षा जास्त पट्टेदार वाघ अनेक वेळा दिसून आले आहेत. वाघाचा संचारमार्ग, संवर्धन क्षेत्र, व्याघ्र प्रकल्प, कॉरिडॉर मुक्ताई भवानी राखीव संवर्धन क्षेत्र अशा एक ना अनेक बिरुदावली लागलेल्या शासकीय उपाययोजना लाल फितीत अडकल्या आहेत.

कोट

वाघाचा अधिवास हा वनपरिक्षेत्रासाठी गौरव आहे. वढोदा वनपरिक्षेत्रात सध्या आठ पट्टेदार वाघांची आहे नोंद. मुबलक अन्न साखळी व पोषक वातावरणामुळे वाघाचा अधिवास येथे आहे.

- अमोल चव्हाण

वनपरिक्षेत्र अधिकारी, वढोदा, मुक्ताईनगर

Web Title: Record of eight leopard tigers in Muktai Kushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.