सीसीसीत १४०० रुग्ण
जळगाव : जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्यांना दाखल करण्यात येते, अशा रुग्णांची संख्या १४११ असून ही संख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटरवरील भारही कमी झाल्याचे चित्र आहे. मध्यतरी शहरातील कोविड केअर सेंटरही फुल झाल्याने रुग्णांची फिर फिर वाढली होती.
ग्रामीणमध्ये ४० रुग्ण
जळगाव :जळगाव ग्रामीणमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढत असून आता गेल्या तीन दिवसांपासून रोज एका बाधिताचा मृत्यू होत आहे. रविवारी ग्रामीण भागात ४० रुग्ण आढळून आले आहेत. तर एका बाधिताच्या मृत्यूचील नोंद झाली आहे. ग्रामीण मधील एकूण रुग्णसंख्या ४०३६ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ९९ झाली आहे.
जि, प. ची आज सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेचे सोमवारी दुपारी २ वाजता ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. याआधी सकाळी ११ वाजता जलव्यवस्थापन समितीची सभा होणार आहे. दरम्यान, १९ रोजी सर्वसाधारण सभेचेही ऑनलाईनच आयोजन करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय सभेतील अनेक मुद्दे या सभेत गाजण्याची शक्यता आहे.