कार्डात वाचन छंदाचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:04 AM2020-04-11T00:04:08+5:302020-04-11T00:04:22+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत जळगाव येथील अभ्यासक जयंत पाटील...

Reflection of a reading hobby in a card | कार्डात वाचन छंदाचे प्रतिबिंब

कार्डात वाचन छंदाचे प्रतिबिंब

googlenewsNext

१९८७ ला स्क्रिन प्रिंटींग सुरू झालेले. त्याच माध्यमातून या कार्डाचे प्रिंटींग झाले आहे. या कार्डात माझ्या वाचन छंदाचे अधिक ठळक प्रतिबिंब पडले आहे. विंदा करंदीकर यांच्या ललित लेखनाचे पुस्तक ‘स्पर्शाची पालवी’ यातून हा मजकूर घेतला आहे. घराचा दिंडी दरवाजा उघडून सुखाची वाट पाहणाऱ्या माणसाला सुख कधीच भेटणार नाही. गोकुळातल्या कृष्णाप्रमाणे सुखालाही सामान्य गोष्टींचे बुरखे पांघरून तुमच्या नकळत संचार करणे अधिक आवडते. त्याची पर्वा न करता आराम खुर्चीत पडा. तुमच्या घराच्या फुटक्या कौलांतून पडणाºया कनडश्याला धरून ते तुमच्या पायाशी केव्हा खेळू लागेल ते तुम्हाला समजणारही नाही. शुभेच्छा देताना मी म्हटलं आहे, ‘अशा सुखाचा एक अर्धा क्षणही तुम्हाला असा मिळो की, त्याच्या स्पर्शानी तुमचे अख्खे १९८७ सुखाने वाकून जावे...’
मराठीत ललित लेखनाचा प्रवाह काहीसा चिंचोळा राहिला आहे. पण गुजगोष्टी तसेच निबंधाच्या तोकड्या चौकटीतून बाहेर पडून खुपच मुक्त झाला आहे. ललित लेखन हे जगण्याचा हात धरुन सोबत चालत असते. विंदा मंडईतून भोपळा आणतानाही असा आणतात की, जणू नोबेल प्राइस आणत आहेत.या कार्डाला प्रतिक्रिया देताना माझे एक ज्येष्ठ स्रेही म्हणतात, ‘सामान्यातून असामान्यत्वाकडे जाणारी सुखाची चोर पावलं आज उंच नि बंद दरवाजे पाहून स्वत: दु:खाचे उसासे टाकीत आहेत. कदाचित दार उघडं सापडलं तरी आतल्या चकाकणाºया वस्तूत त्याचा जीव गुदमरतो. सुख म्हणजे हे सगळं? या आतल्या माणसांना निस्पृह एक क्षणदेखील बघायला तयार नाहीत! या अशा क्षणात मी सामावलेला आहे, हे यांना का बरं कळत नाही! तुम्हाला या क्षणाचा साक्षात्कार झालेला आहे. तो सतत होत रहावा ही इच्छा.
माझ्या भावना व्यक्त होतील अशी द.भा.घामणस्कर यांची कविता
‘मी चराचराशी निगडीत’
‘प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.
मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर,
आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखील. मला ऐकायची
नाहीत म्हणूनच तुमच्या
भयभित मनाची प्रेम न करण्याची कारणे,
मला ऐकू येत नाही तुमची
हलक्या आवाजातील कुजबुज,
मी नाकारतो तुमचा मौल्यवान टेपरेकॉर्डर
माझ्याविरूद्ध उच्चारलेला हरेक शब्द मला पोहचवणारा...
मी फिरेन संवादत, कधी जवळच्या झाडाशी,
कधी दूरच्या मेघाशी,
एकटेपणा संपलेला
मी एक पुणात्मा आहे...
मी सर्व चराचराशी निगडित...
सूर्यास्त पाहताना मीही होता निस्तेज,
सांजवताना काळाभोर हळूहळू मी नष्ट होतो
रात्रीच्या अंधारात आणि उगवतो
नवा दिवस उजाडताना नवा जन्म झाल्यासारखा...
-जयंत पाटील, जळगाव

Web Title: Reflection of a reading hobby in a card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.