कोरोनातील ‘हॅपी हायपोक्झिया’ या घातक शारीरिक स्थितीची जनजागृती करताय ‘महसुली’ डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:29 PM2020-07-11T14:29:28+5:302020-07-11T14:31:57+5:30

प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे.

‘Revenue’ doctor raises awareness of ‘Happy Hypoxia’ in Corona | कोरोनातील ‘हॅपी हायपोक्झिया’ या घातक शारीरिक स्थितीची जनजागृती करताय ‘महसुली’ डॉक्टर

कोरोनातील ‘हॅपी हायपोक्झिया’ या घातक शारीरिक स्थितीची जनजागृती करताय ‘महसुली’ डॉक्टर

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकरप्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्यातील हाडाचा डॉक्टर समाजाच्या आरोग्यासाठी देतोय कडा पहारादडलेला हाडाचा डॉक्टर खऱ्या अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : अनलॉकच्या दुसºया टप्प्यात कोरोनाचा वाढता सामाजिक प्रादुर्भाव पाहता आरोग्य यंत्रणेला व समाजमनाला चकवा देत समाजमनात काही कोरोना बाधित सूप्त वाहकांंच्या ‘हॅपी हायपोक्झिया’ या अत्यंत घातकी अशा रूग्णाला बाह्यांगाने सदानंदी असलेल्या पण अंतरंगाने शरीरातील लाखो पेशी मृत पावून मरणयातना भोगण्याची गंभीर व तितकीच समाजमनाला चकवा देणाºया लक्षणांची जनजागृती डॉ.अजित थोरबोले हे करीत आहेत.
समाजव्यवस्थेचे आरोग्य जोपासण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातील नव्हे तर चक्क महसूल विभागात फैजपूर प्रांताधिकारी तथा कोविड आपत्ती समादेशक म्हणून सेवारत असलेले डॉ.अजित थोरबोले यांच्यातील दडलेला हाडाचा डॉक्टर खºया अर्थाने जागल्याची भूमिका समाजमनात कौतुकास्पद ठरली आहे.
महसूल प्रशासनात आपत्ती व्यवस्थापन व शिस्त जोपासताना त्यांनी कधी मेणाहून मऊ होऊन, तर कधी वज्राहून कठीण होताना फौजदारी कारवाईदेखील केली. मात्र कोरोनाचा जसजसा प्रसार फैजपूर उपविभागीय क्षेत्रात पाय पसरू लागला तसतसा त्यांच्यातील हाडाचा डॉक्टर जागी होऊ लागला. डॉ.थोरबोले हे ‘बीएएमएस’ पदवीधारक डॉक्टर असल्याने त्यांची रुग्णसेवा उजागर होऊ लागली. म्हणून त्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरला सातत्याने भेटी देत रुग्णांची आरोग्य सेवा, भोजन व चहापान, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांनी रुग्णांची काळजी घेत त्यांच्याशी हितगुज साधताना सकारात्मक भावनेने अनेकदा धीरही दिला. त्यांनी आपल्या हाडातील डॉक्टर जागी ठेवत काळजीपूर्वक पावले उचलून निव्वळ तासागणिक वेतनावर आधारित कर्तव्यदक्षता नव्हे तर आपत्ती व्यवस्थापनात वैद्यकशास्त्रातील रूग्णसेवेप्रमाणे त्यांनी झोकून दिले आहे.
त्यात सद्य:स्थितीत त्यांनी रावेर व यावल तालुक्यातील आरोग्य केंद्रनिहाय बैठका घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची संकल्पना मांडली. किंबहुना, कोरोना या विषाणूमुळे सामाजिक संक्रमण होत असल्याची गंभीर बाब पाहता ‘हॅपी हायपोक्झिया’ या समाजमनावर गुगली टाकणाºया शारीरिक अवस्थेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी समाजजागृती करण्याचा प्रसंगावधान राखून घेतलेली भूमिका स्वागतार्ह ठरली आहे. ‘हॅपी हायपोक्झिया’ या कोरोनाच्या गुगली टाकणाºया लक्षणाबाबत त्यांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नसल्याने तो वरकरणी अतिशय आनंदी दिसत असला तरी, त्याच्या फुफ्फुसात घर केलेल्या कोरोनाच्या विषाणूने सर्व पेशी गिळंकृत करीत आॅक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण करीत असतो व शरीरातील रक्तपेशींना पूर्णपणे प्राणवायू न भेटल्याने हा रुग्ण अंतिम स्थितीत प्राणवायूअभावी मरण यातनेकडे वाटचाल करीत असतो अशी जनजागृती त्यांनी केली आहे. म्हणूनच अशा हॅपी हायपोक्झिया असलेल्या समाजातील सुप्त कोरोना वाहकांचा शोध घेण्यासाठी आॅक्सीपल्समीटरने आॅक्सीजनचे सरासरी प्रमाण मोजण्याची काळाची गरज असल्याचे प्रबोधन डॉ.थोरबोले यांनी समन्वय बैठकांमधून सातत्याने केले आहे. त्यामुळे ‘हॅपी हायपोक्झिया’ असलेल्या कोरोना बाधित रूग्णांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कोरोना चाचणी व औषधोपचारासाठी तातडीने दाखल करण्याबाबत डॉ.थोरबोले यांनी सातत्याने आवाहन केले.
प्रांताधिकारी वा आपत्ती व्यवस्थापन समादेशक या पदांच्या जबाबदारीखेरीज त्यांच्यातील हाडाचा डॉक्टर जागृत झाल्याने त्यांनी कोरोनाची गुगली टाकणाºया ‘हॅपी हायपोक्झिया’ या लक्षणांना समाजमनात पल्स आॅक्सीमीटरच्या माध्यमातून उघडे पाडण्यात यश साध्य केल्याने डॉ.थोरबोले या महसुलातील डॉक्टरांना समाजमनातून खºया अर्थाने सलाम केला जात आहे.

Web Title: ‘Revenue’ doctor raises awareness of ‘Happy Hypoxia’ in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.