रिपाइंची गुरुवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:43+5:302021-09-22T04:19:43+5:30

आयकर विभागातर्फे वृक्षारोपण जळगाव : केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत आयकर विभाग आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Ripai's meeting on Thursday | रिपाइंची गुरुवारी बैठक

रिपाइंची गुरुवारी बैठक

googlenewsNext

आयकर विभागातर्फे वृक्षारोपण

जळगाव : केंद्र सरकारच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत आयकर विभाग आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुण तलावाच्या परिसरात २०० वृक्ष लावण्यात आले. यावेळी संयुक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी, अन्न व औषध निरीक्षक राम भरकड, ॲड. जमिल देशपांडे, उपायुक्त शकील अन्सारी, आयकर अधिकारी एन. कृष्णमूर्ती अय्यर, अनिल जसोरिया, महिपाल सिंह, राकेश रंजन, मनीष भगत, कार्यालय अधीक्षक सुनील माने उपस्थित होते.

फोटो - वृक्षारोपण करताना विवेक होशिंग, विजय वाणी, राम भरकड, जमील देशपांडे, डॉ. बेंद्रे, विशाल मकवाने, शकील अन्सारी, कृष्णमूर्ती अय्यर, अनिल जसोरिया, महिपाल सिंह, राकेश रंजन, मनीष भगत.

युवा परिषदेने केेले निर्माल्य संकलन

जळगाव : अनंत चतुर्दशीला भारतीय राष्ट्रीय युवा परिषद आणि नीर फाउंडेशनने मेहरुण तलाव परिसरात विसर्जनस्थळी निर्माल्य संकलन केले. तीन तासांमध्ये भाविकांकडून चार ट्रॉली निर्माल्य संकलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, उपाध्यक्ष अविनाश जावळे, सागर महाजन, सचिव आकाश धनगर, आकाश पाटील, इरफान पिंजारी, भावेश रोहिमारे, नयनकुमार पाटील, सौरभ जन, रोशन मुंडले, रवींद्र सपकाळे, विनय दुग्गड, गौरव निकम, आशिष सोनार, मयूर कोळी यांनी परिश्रम घेतले.

सागर सपकाळे यांना सेवारत्न पुरस्कार

जळगाव : येथील कुसुमताई फाउंडेशन नि:स्वार्थ अन्नसेवेचे संचालक सागर सपकाळे यांना यवतमाळ येथील बेटी फाउंडेशनचा २०२१ चा आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सागर सपकाळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Web Title: Ripai's meeting on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.