आनंद सुरवाडे जळगाव : कोरोना विषाणूचा मधुमेह रुग्णांना अधिक धोका असल्याचे चित्र एकंदरित जिल्ह्याच्या परिस्थिती व आकडेवारीनुसार समोर येत आहे़ शासनाने काही दिवसांपूर्वी बैठकीतही मृत्यूचे विश्लेषण मांडले असता ६६ टक्के रुग्णांना अन्य व्याधी होत्या, असे सांगितले होते़ त्यातही मधुमेह असलेल्यांची संख्या अधिक असल्याचे आता समोर येत आहे़जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहेत़ त्यातच अन्य व्याधी असलेल्या रुग्णांवर प्रामुख्याने यंत्रणा लक्ष ठेवून आहे़ अन्य व्याधींमध्येही मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे़मधुमेहामुळे शरीराची प्रतिकार क्षमता अगदीच कमी असते, त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे़ शंभर मृत्यूमागे किमान २० रुग्णांना केवळ मधूमेह होता, अशीही माहिती डॉक्टरांकडून समोर येत आहे़पुरुषांना अधिक धोकाशासनाने केलेल्या विश्लेषणानुसार १८१ मृत्यूंमध्ये १२७ हे पुरुष असून ५४ महिला आहेत़ त्यानुसार पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक हे या आकडेवारीवरून समोर येत आहे़मधुमेह असणाऱ्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते़ अशा स्थितीत त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना अधिकच धोका असतो़ आपल्याकडील मृत्यूचे प्रमाण बघितले तर पंधरा ते वीस टक्के रुग्णांना मधुमेह होता़ मधुमेहामुळे शरीराच्या अन्य अवयवयांवर परिणाम होत असतो़ त्यामुळे बाधित रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़- डॉ़ भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्रज्या रुग्णांना मधुमेह आहे व रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशांना कोरोनाची लागण झाल्यास आॅक्सिडेटिव स्ट्रेस वाढल्यामुळे त्यांची आॅक्सिजनची क्षमता खालावते़ यासह रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अशा रुग्णांमध्ये अधिक असते़ सोबत ईन्फ्लमेशन, वाढल्यामुळे सिरम फेरीटीन, सिरम सीआरपी, सिरम ईएसआर, सिरम फ्राबोनोजेन, सिरम ईन्टलुकिनचे प्रमाण वाढून मधुमेहाचे रुग्ण लवकर दगावतात़ हे पूर्ण जगात निदर्शनास आलेले आहे़ शंभरपैकी २७ रुग्ण उशीर केल्यामुळे साखर नियंत्रणात नसल्याने मृत्यूमुखी पडतात़- डॉ़ परिक्षित बाविस्कर, मधुमेह तज्ज्ञ
कोरोनाचा वाढता संसर्ग, कोणत्या आजाराच्या रुग्णांनी घ्यावी अधिक काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:51 PM