चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 01:20 PM2021-08-31T13:20:57+5:302021-08-31T13:36:53+5:30

बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला.वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

Rivers and streams flooded in Chalisgaon area | चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर

चाळीसगाव परिसरात नदी - नाल्यांना पूर

Next
ठळक मुद्देशहरात बाजारपेठेतही शिरले पाणी, पशुधनाचे नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहर व ग्रामीण भागात मंगळवार पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने बुधवारी पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या  दक्षिणेला असणाऱ्या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले असून जनावरे दगावली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी सकाळी सहा वाजताच महसुल प्रशासनाला नुकसानीसह परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहे. तहसिलदार अमोल मोरे हेही स्थितीचा आढावा घेत आहे.

तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाॕकीज परिसर जलमय झाला असून शिवाजी घाट परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तितूर नदीलाही पूर आल्याने घाट रोडवरील जुन्या पुलावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गत २४ तासात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक १४५ मिमी पाऊस तळेगाव मंडळात त्याखालोखाल चाळीसगाव मंडळात ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

मन्याड धरणातूनही पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदी - नाले दूथडी भरुन वाहू लागल्याने गिरणा नदीही वाहू लागली आहे. सकाळपासून जामदा बंधाऱ्यावरुन १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारनंतर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठालगतच्या रहिवाश्यांना सर्तकतेच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान या पावसामुळे पीकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

चाळीसगावला तुफान पाऊस...डोंगरी व तितूर नदीला पूर...पाणी शिरले मुख्य बाजारपेठेत....

पाटणादेवी रोड लगतचा बामोशी बाबा दर्गाह परिसर...जलमय...डोंगरी नदीला  मोठा पूर...सर्तक राहण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन...

कोदगाव धरण भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु.. 

पाटणादेवी येथील नदी नाले तुंडुब भरुन वाहु लागले, राञभर मुसळधार पाऊस..

वाघडू वाकडी गावात नदीचे पाणी शिरले गुरे म्हशी वाहून गेले.

चाळीसगावला तितूर नदीलाही पूर...पुराचे पाणी...डॉ. पुर्णपात्रे हाॕस्पीटल पर्यंत...

रोकडे, ता. चाळीसगाव येथे म्हशी वाहून मेल्या.

मजरे गावातही पाणी शिरले.

वाघडू नदी पुलावरून पाणी चाळीसगाव ते नागद चाळीसगाव जाणारा मार्ग संपर्क तुटला.

गणेशपूर तितूर नदीला सकाळी दोन वाजता पूर चितेगाव धरण १००% भरण्याची शक्यता.

कन्नड घाटातही ठिकठिकाणी भूस्सखलन... वाहतूक ठप्प...

Web Title: Rivers and streams flooded in Chalisgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.