भुसावळ : येथून जवळच असलेल्या अंजाळे घाटात अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी सुमारे आठ ते दहा ट्रक चालकांवर दगडफेक करीत चाकू व तलवारीचा धाक दाखवून सुमारे १ लाखाची रक्कम लुटल्याची घटना सोमवारी ५ रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भुसावळ व यावल तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु आहे. यामुळे सध्या वाहतूक बंद आहे . मात्र अत्यावश्यक सेवांसाठी काही वाहनांमधून जीवनावश्यक वस्तूंची ट्रकद्वारे ने- आण करण्यात येत आहे. सध्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. याचा गैरफायदा काही दरोडेखोरांनी घेतला.७ ते ८ जणांची टोळीअंजाळे घाटामधून येणाऱ्या- जाणाºया वाहनांवर ७ ते ८ जणांच्या टोळीने वाहनांवर दगदफेक दगडफेक करीत वाहनांचा फोडल्या काचा फोडल्या. यावेळी शस्त्रांचा धाक दाखवून लूट करण्यात आली. यात ट्रक क्रमांक एम. एच .०४ - १०९७ , एम. एच.४८ - ११८६ , एम . एच. ४८ - ०६३९ , डब्ल्यू. बी . ११ - बी - ५६४९ अशा काही गाड्यांची तोडफोड करीत लूट केली.या दरोडया बाबत काही नागरीकांनी दूरध्वनीच्या शंभर क्रमांकावर जळगाव येथील एसपी कार्यालय माहिती दिली. यानंतर भुसावळ शहर पोलिस ठाणे तसेच यावल पोलिसांना ही माहिती मिळतान त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व तपासणी करुन ही वाहने पोलीस बंदोबस्तात भुसावळ येथील शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आली . मात्र ही घटना यावल पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्यामुळे सर्व वाहने यावल येथे रवाना करण्यात आली.दरम्यान , भीतीपोटी यावल पोलिसात या संदर्भात एकही ट्रक चालक तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आला नसल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. तर पोलिसांनी मात्र या दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे.
ट्रक चालकांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 9:02 PM