बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:40 PM2021-11-24T12:40:13+5:302021-11-24T12:40:34+5:30
अटक केलेल्या तिघांशिवाय आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
जळगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या तीन कोटी रुपये किमतीच्या ६ किलोहून अधिक वजनाच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. तालुक्यातील आमडदे येथील शाखेत हा प्रकार घडला. पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये घटनेचा पर्दाफाश केला.
या गुन्ह्यात बँकेतील शिपाई राहुल पाटील (२४), विजय पाटील (३९) व विकास पाटील (३७) यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी आले. बँकेच्या मागे राहणारा शिपाई राहुल पाटील यास पोलिसी खाक्या दाखविला असता तो पोपटासारखा बोलू
लागला.
अटक केलेल्या तिघांशिवाय आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तिघा आरोपींपैकी एका आरोपीने आमडदे शेतशिवारात खड्डा करून लपविलेले दागिने आरोपींनी पोलिसांना काढून दिले.