मायादेवी नगरातील रोटरी भवनात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सचिव टॉबी भगवागर, कॉन्फरन्स कमेटी चेअरमन अतुल शहा, जुमाना शाकीर, सहप्रांतपाल योगेश भोळे, प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगीता पाटील, अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल उपस्थित होते.
वर्षभर प्रेरणादायी कार्य
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने कोविडच्या आव्हानात्मक काळात मार्च २०२०पासून लसीकरणाच्या मोहिमेपर्यंत वर्षभर प्रेरणादायी कार्य केले आहे, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी यावेळी केले.
आम्हाला मिळालेला पुरस्कार म्हणजे हा जिल्ह्याचा सन्मान असून रोटरी वेस्टने केवळ शहरात नव्हे तर जिल्ह्यात ऑक्सिजन पाईपलाईनसह लसीकरणाच्या कार्यात सक्रिय सहभाग दिला आहे, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, सहप्रांतपाल योगेश भोळे, माजी अध्यक्ष संगीता पाटील, गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष तुषार चित्ते यांनी वर्षभरातील कार्याच्या माहिती दिली. सूत्रसंचालन केकल पटेल यांनी केले तर नियोजित अध्यक्ष कुमार वाणी यांनी आभार मानले.