आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:42 PM2017-11-03T15:42:55+5:302017-11-03T15:43:08+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेंड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी ’ या सदरात प्रा.डॉ. विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

Saint Shankar Maharaj who struggled for the welfare of tribal people | आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

आदिवासी भागात जनकल्याणासाठी झटणारे संत श्री शंकर महाराज

googlenewsNext

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव टाकळी येथे 18 मार्च 1915 रोजी शंकर महाराजांचा जन्म झाला. या गावात आदिवासी समाजाचे एकुलते एक घर होते. त्यांच्या वडिलांना नऊ एकराचा एक तुकडा इनाम दाखल मिळाला होता. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपले. शंकर महाराज पोरके झाले पण समाजाचे पोरकेपण दूर केले. एकाकी महाराज मामांकडे वाढले. गावची चाकरी करावी आणि भाकरी मागून खावी असा दिनक्रम होता. वयाच्या 13 वर्षार्पयत हे असे सुरू होते. वयाच्या चौदाव्या वर्षी महाराजांना विरक्तीने घेरले. शिरसगाव येथील रहिवासी दादाभाऊ पाटील यांच्या मळ्यात औदुंबराच्या वृक्षाखाली महाराजांनी निवास केला. पुनश्च गावात न परतण्याचा निश्चय केला. तेथेच एक कुटी बांधली. औदुंबराखाली तपाचरणाला आरंभ झाला. कुणाला काही देणे नाही आणि कुणापाशी काहीही मागणे नाही हा आरंभापासूनचा शिरस्ता होता. वेळेवर कुणी काही आणून दिले तर भले, नाही दिले तरी भले अशी वृत्ती होती. जे मिळेल ते अन्नब्रrा म्हणून सेवन करायचे असा थाट होता. दादाभाऊ पाटील यांचे धाकटे बंधू तुकाराम पाटील त्यांना भोजन आणून देत असत. महाराज अपरिग्रही वृत्तीने राहात. भल्या पहाटे उठावे, गार पाण्याचे स्नान करावे. संत तुकोबा-नामदेव महाराजांचे अभंग म्हणावेत. महाराजांचा आवाज सुरेल होता. ते उत्तम चित्रे काढत असत. बासरी तर विलक्षण एकाग्रतेने वाजवत असत. त्या स्वरांनी उभे रान वेडावून जाई. सर्वत्र नामघोषाचा अमृतध्वनी विहरत राही. महाराजांचे अक्षर वाटोळे, सुंदर आणि चित्रात्मक शैलीचा एक नमुना म्हणता येईल. रानात ते निर्भयपणे एकटेच राहात. आत्मसाक्षात्काराच्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांच्या लेखणीचे आद्र्र होणे स्वाभाविक आहे. ते म्हणतात ‘शके 1857 साली माघ महिन्यात कृष्ण पक्षातील विजया स्मार्त एकादशी रोज मंगळवार ते दिवशी ईश्वरभक्त शंकर हा रात्री ईश्वराचे ध्यान करता बसला होता. अर्धी रात्र झाली होती. मला साक्षात दत्तात्रेयाचा साक्षात्कार झाला.’ आपल्या जन्म आणि चरित्राबद्दल महाराज असे म्हणत असत, ‘रामावतारात सीतेचा शोध करीत असताना प्रभू रामचंद्रांना वाटेत शबरी भिल्लीणीचा आश्रम लागला. शबरीने रामाला आश्रमात बोलावले. तिने बोरे खाण्यास दिली. जाताना तिला विचारले, ‘तुला कायम हवे ते मागून घे.’ तिने काहीच मागितले नाही करिता तिच्या कुळात जन्म घेऊन रामभक्ती करून तिचे ऋण फेडले. त्या करताच मला या काळात तिच्या कुळात जन्म घ्यावा लागला.’ शंकर महाराजांचे आत्मचरित्र काही केवळ चमत्कारिक कथाप्रसंगांनी भरलेले चरित्र नाहीये. यात ज्ञान विज्ञान, भाषोत्पत्ती, सृष्टी रहस्य, साधूलक्षणे याशिवाय देवदेवतादिकांच्या पृथ्वीतलावर अनेक उपयुक्त, तर्कसंगत आणि प्रत्ययकारी कथा आहेत. यात चौदा भुवनांची नावे आहेत. चौसष्ठ कलांची सुसूत्र यादी आहे. हे एक अतिशय मनोरम संवादात्मक पद्म आहे. यात कलियुगाचे केलेले वर्णन अतिशय उचित आहे. महाराज कलियुगाचे असे वर्णन करतात, ‘कलियुग येताच केवळ शंभर निमिषे आयुष्य राहील.’ शंभर निमिष म्हणजे मृत्यूलोकाची शंभर वर्षे असतील. आता हिरव्या पक्षाच्या पोटी मोत्ये उत्पन्न होतात पण कलियुगात कली लागताच मोत्ये नष्ट होऊन समुद्रात उत्पन्न होतील.’ कलियुगाचे वर्णन हे पुराणांतर्गत येणारे एक लोकविलक्षण असे प्रकरण आहे.महाराजांच्या आत्मचरित्रातील एका मनोरम कवितेच्या काही ओळी उद्धृत करून महाराजांच्या परिनिर्वाणाची चर्चा करू या. तेव्हा नारण म्हणे जी शंकरा। तरुण असताही दिसतोसी म्हातारा हे न कळे मज द्विकंठेश्वरा मग इथे नरा काही न कळे । कोण जाणे कैसी गती ही न कळे मजप्रती काय वणरू मायापती सांग आता महाराजांनी योगसामथ्र्याने वृद्धत्व पांघरून घेतले होते. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी 21 जुलै 1945 आषाढ शुद्ध एकादशीदिनी ब्राrामुहूती 8महाराज ब्रrालीन झाले. शहादा तालुक्यातील मनरद येथे त्यांची समाधी आहे.

Web Title: Saint Shankar Maharaj who struggled for the welfare of tribal people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.