लोण प्र. उ. येथील संरपच व सदस्याचे अपील फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:04+5:302021-08-01T04:17:04+5:30
या अपिलावर सुनावणी होऊन अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी दि. २९ रोजी सरपंच व सदस्याचे अपील फेटाळले व ...
या अपिलावर सुनावणी होऊन अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी दि. २९ रोजी सरपंच व सदस्याचे अपील फेटाळले व जळगाव जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवला आहे.
तालुक्यातील लोण प्र. ऊ.च्या सरपंच संगीता बापू पाटील व सदस्य बापू नागो पाटील यांनी लोण प्र. उ. ग्रामपंचायत मालकीची मिळकत नं ३९/१ या मिळकतीवर ५४० चौरस फूट जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून आरसीसी पक्के राहते घराचे बांधकाम करून पदाचा दुरुपयोग केला. म्हणून दोघे पती-पत्नी यांना सदस्य पदावरून अपात्र ठरवावे, अशी तक्रार गीता भाऊसाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिली होती. त्या तक्रारीवर चौकशी होऊन सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदावरून दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी अपात्र ठरविले होते. या आदेशाविरुद्ध पाटील पती पत्नी यांनी नाशिक येथील अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते.
नाशिक अप्पर आयुक्त यांनी याबाबत संपूर्ण रेकॉर्ड, पुरावे पाहून व चौकशी करून अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे सरपंच यांचे अपील फेटाळले असून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. तक्रारदार गीता पाटील यांच्यातर्फे ॲड. बी. आर. पाटील व ॲड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष्य लागून होते.