ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- महसूलच्या अधिका:यांनी जप्त केलेल्या अवैध वाळू उपसा करणा:या ट्रॅक्टरवरुन महसुल विभागाच्या एका कर्मचा:याला मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी खाली फेकून जप्त केलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास दुध फेडरेशन जवळील पेट्रोल पंपासमोर घडली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निमखेडी येथील गिरणा नदीपात्रातुन अवैधरीत्या वाळू उपसा होत असून, शुक्रवारी निमखेडी रस्त्यावरील कांताई नेत्रालय समोर माजी नगरसेवक कैलास सोनवणेंसह काही जणांनी अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर अडविले होते. याबाबतची माहिती कैलास सोनवणे यांनी तहसिलदार अमोल निकम यांना दिली. मात्र निकम हे जिल्हाधिका:यांसोबत बैठकीत उपस्थित असल्याने, त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांना निमखेडी शिवारात जावून संबंधित ट्रॅक्टर जप्त करण्याचा सूचना दिल्या. दोन्ही ट्रॅक्टर केले जप्त दरम्यान, खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयातील रविराज बाविस्कर, शिपाई भिमराव देसले व तहसिलदार यांच्या गाडीचे चालक सचिन पाटील यांना सोबत घेवून कांताई नेत्रालय येथे पोहोचले व दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले. दीपक चव्हाण यांनी एका ट्रॅक्टरवर शिपाई भिमराव देसले यांना बसवून हे ट्रॅक्टर तहसिल कार्यालयाकडे नेण्यास सांगितले. तर दुस:या ट्रॅक्टरवर चालकासह रविराज बाविस्कर यांना बसविले. चव्हाण हे तहसिलदारांच्या वाहनात बसून ट्रॅक्टर मागे येत होते. देसले चालवित असलेले ट्रॅक्टर सुरु होत नसल्याने तेथेच थांबले होते. भरधाव वेगाने पळविले ट्रॅक्टरएक ट्रॅक्टर सुरु होत नसल्याचे पाहून दुस:या ट्रॅक्टर चालकाने महसुल कर्मचा:याला बसवून भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविले. त्यानंतर हे ट्रॅक्टर दुध फेडरेशन समोरील भाग्यश्री पेट्रोल पंपा जवळ आल्यानंतर तीन ते चार मोटारसायकलस्वारांनी त्यांना गाठत ट्रॅक्टर रस्त्यात थांबविल्यानंतर महसुल कर्मचा:याचा हात धरून ट्रॅक्टर वरुन फेकून दिले. यात त्या कर्मचा:याला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर दिपक चव्हाण यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रय} केला. मात्र ते पसार झाले. वाळू माफियांची वाढती ‘दबंग’गीरीनिमखेडी येथील गिरणा नदीपात्रातुन अवैधरीत्या वाळू उपसा सुरुच असून वाळू माफियांना लगाम लावणा:या महसूल प्रशासनाला वाळू माफियांचा वाढत्या दबंगगीरीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.