ही वाळू खुलेआम चोरीस जात आहे. असे असताना महसूल विभागाचे अनेक कर्मचारी, यात तलाठी हे आपल्या महसूल गावी रोज ये-जा करतात. त्यांनीदेखील या वाळू तस्करीकडे डोळेझाक केली आहे. या परिसरातील रस्त्यांचे अवजड वाहन म्हणजे वाळूने भरलेल्या डंपर, ट्रॅक्टरमुळे तीन-तेरा वाजले आहेत. याकडे महसूल विभागाची डोळेझाक चालू आहे. तरी वाळूचा उपसा त्वरित बंद करावा. वाळूची चोरी थांबवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
असाच प्रकार हनुमंत खेडेसिम या गावालगत होत होता. यावेळी हनुमंत खेडेसिम येथील काही नागरिकांनी वाळू चोरी थांबवली. भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून आपल्या गाव परिसरातील वाळू चोरी थांबवली; परंतु भविष्यकाळाचा विचार करून वाळू उपसा व वाळू चोरी महसूल विभागाने जातीने लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी होत आहे.