लोहारी आरोग्य उपकेंद्राला सरपंचांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:09+5:302021-07-29T04:17:09+5:30

वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या लोहारी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका व आरोग्य सेवक नसल्यामुळे सरपंच रंजना ...

Sarpanch knocks down Lohari health sub-center | लोहारी आरोग्य उपकेंद्राला सरपंचांनी ठोकले कुलूप

लोहारी आरोग्य उपकेंद्राला सरपंचांनी ठोकले कुलूप

Next

वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या लोहारी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका व आरोग्य सेवक नसल्यामुळे सरपंच रंजना प्रवीण पाटील ग्रा. पं. सदस्य शरद पाटील, युसूफ काकर यांनी दि. २८ रोजी उपकेंद्राला कुलूप ठोकले.

या आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये लोहारी बु।।, लोहारी खुर्द, आर्वे, दत्तनगर, विष्णूनगर, करीमनगर, इंदिरानगर, अब्दुल हमीदनगर श्रीकृष्णनगर, त्र्यंबकनगर ही गावे व वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे; परंतु गेल्या तीन वर्षांपासून या आरोग्य उपकेंद्रात एकही कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर आरोग्याच्या विविध समस्या उत्पन्न होत असतात. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही तसेच लोहारीवासीय जनता शासनातर्फे आरोग्यासंबंधी पुरवल्या जाणाऱ्या सुखसुविधांपासून वंचित आहेत.

आमच्या गावास तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ हे हेतुपुरस्सर सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप सरपंच रंजना पाटील यांनी केला आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी आरोग्य सेविका योगीता खैरनार या चांगली सेवा देत असतानासुध्दा त्यांची बदली केली तसेच आरोग्यसेवक नरेंद्र पाटील यांचीदेखील बदली करण्यात आली. त्यांच्या जागी गाळण येथील आरोग्य सेविका के. बी. फुले यांची तात्पुरती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिलांना प्रसूतीसंबंधित समस्या निर्माण झाल्यावर तालुकास्तरावर जावे लागते. गोरगरीब जनतेची लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली असल्यामुळे त्यांना प्रपंचाचा खर्च भागवताना नाकीनव येत आहे. त्यातच आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्यास औषधोपचाराचा खर्च पेलला जात नाही, अशी परिस्थिती असताना हा विषय आमदार किशोर पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही परिस्थितीत काही एक फरक पडला नाही.

या कारणांमुळे सरपंच व सदस्यांसह आरोग्य उपकेंद्रास कुलूप ठोकले. या सर्व समस्यांची जोपर्यंत दखल घेतली जात नाही, तोवर आम्ही कुलूप उघडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत, ते चुकीचे असून या आरोग्य सेविकेची बदली प्रशासकीय झाली आहे. तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मुख्यालयात राहण्यास कटिबद्ध आहेत; परंतु ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांनी याबाबत कधीही पाठपुरावा केला नाही. माझ्या स्तरावर मी त्यांना पत्र दिले आहे की, मुख्यालयाला राहून सेवा द्या. वैद्यकीय अधिकारीदेखील दिलेले आहेत. एएनएम नाही म्हणून मी गाळण येथील कॉंट्रॅक बेसच्या एएनएम के. बी. फुले यांना प्रभारी पदभार दिलेला आहे. तसेच समूह वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले की, संबंधित एएनएम तेथे रहायला आल्या नाही तर मी त्यांना पत्र देणार आहे की, त्यांना शासकीय सेवेची गरज नाही. त्यांना कार्यमुक्तचे आदेश काढणार आहे. आजची तालुक्याची स्थिती ३४ पदे आहेत. २० जागा रिक्त आहेत. येत्या एक दीड महिन्यात भरती होणार आहे त्यानंतर एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल व समस्या निवळेल.

-समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी, पाचोरा

लोकमत न्यूज नेटवर्क

वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या लोहारी बुद्रुक गावी येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका व आरोग्य सेवक नसल्यामुळे सरपंच रंजना प्रवीण पाटील ग्रा. पं. सदस्य शरद पाटील, युसुफ काकर यांनी दि. २८ रोजी कुलुप ठोकले.

या आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये लोहारी बु।।, लोहारी खुर्द, आर्वे, दत्तनगर, विष्णूनगर, करीमनगर, इंदिरानगर, अब्दुल हमिदनगर श्रीकृष्णनगर, त्रंबकनगर ही गावे व वाड्या-वस्त्या यांचा समावेश आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या आरोग्य उपकेंद्रात एकही कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर आरोग्याच्या विविध समस्या उत्पन्न होत असतात. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही तसेच लोहारीवासीय जनता शासनातर्फे आरोग्यासंबंधी पुरवल्या जाणाऱ्या सुखसुविधांपासून वंचित आहेत.

आमच्या गावास तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ हे हेतुपुरस्सर सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप सरपंच रंजना पाटील यांनी केला आहे. दोन अडीच वर्षांपूर्वी आरोग्य सेविका योगिता खैरनार या चांगली सेवा देत असतानासुध्दा त्यांची बदली केली तसेच आरोग्यसेवक नरेंद्र पाटील यांचीदेखील बदली करण्यात आली. त्यांच्या जागी गाळण येथील आरोग्यसेविका के. बी. फुले यांची तात्पुरती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिलांना प्रसुती संबंधित समस्या निर्माण झाल्यावर तालुकास्तरावर जावे लागते. गोरगरीब जनतेची लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली असल्यामुळे त्यांना प्रपंचाचा खर्च भागवताना नाकीनऊ येत आहे. त्यातच आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाल्यास औषधोपचाराचा खर्च पेलला जात नाही, अशी परिस्थिती असताना हा विषय आमदार किशोर पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावरदेखील परिस्थितीत काही एक फरक पडला नाही.

या कारणांमुळे सरपंच व सदस्यांसह आरोग्य उपकेंद्रास कुलुप ठोकले. या सर्व समस्यांची जोवर दखल घेतली जात नाही, तोवर आम्ही कुलुप उघडणार नसल्याचे सांगितले.

माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत, ते चुकीचे असून या आरोग्य सेविकेची बदली प्रशासकीय झाली आहे. तसेच आरोग्यसेवक, आरोग्यसेविका मुख्यालयात राहण्यास कटीबद्ध आहेत. परंतू ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांनी याबाबत कधीही पाठपुरावा केला नाही. माझ्या स्तरावर मी त्यांना पत्र दिले आहे की, मुख्यालयाला राहून सेवा द्या. वैद्यकिय अधिकारीदेखील दिलेले आहेत. ए.एन.एम नाही म्हणून मी गाळण येथील कॉंट्रॅक बेसच्या एएनएम के. बी. फुले यांना प्रभारी पदभार दिलेला आहे. तसेच समुह वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले की, संबंधीत एएनएम तेथे रहायला आल्या नाही तर मी त्यांना पत्र देणार आहे की, त्यांना शासकीय सेवेची गरज नाही.त्यांना कार्यमुक्तचे आदेश काढणार आहे. आजची तालुक्याची स्थिती ३४ पदे आहेत. २० जागा रिक्त आहेत. येत्या एक दिड महिन्यात भरती होणार आहे त्यानंतर एक आरोग्यसेवक व एक आरोग्यसेविका प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल व समस्या निवळेल.

-समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी, पाचोरा

280721\28jal_15_28072021_12.jpg

लोहारी आरोग्य उपकेंद्राला सरपंचांनी ठोकले कुलूप

Web Title: Sarpanch knocks down Lohari health sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.