आठवडाभरासाठी वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:06 PM2019-11-08T22:06:55+5:302019-11-08T22:07:56+5:30

जळगाव : विमान कंपनीने विमानाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या वेळापत्रकानुसार अहमदाबादहून २ तास उशिराने विमान येणार आहे, तर ...

Schedule changes for the week | आठवडाभरासाठी वेळापत्रकात बदल

आठवडाभरासाठी वेळापत्रकात बदल

Next

जळगाव : विमान कंपनीने विमानाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या वेळापत्रकानुसार अहमदाबादहून २ तास उशिराने विमान येणार आहे, तर मुंबईकडून येणारे विमान २ तास लवकर येणार आहे. आठवडाभरासाठी हा बदल असेल.
नव्या वेळापत्रकानुसार अहमदाबादहून जळगावला सकाळी १०. २० मिनिटांनी विमान न येता, १२ वाजता येईल. त्यानंतर जळगावहून मुंबईला १२ वाजून २५ मिनिटांनी झेपावत आहे. तर मुंबईहून दुपारी ४. २० मिनिटांनी न निघता, दुपारी सव्वा दोन वाजता निघून जळगावला साडेतीनला येत आहे. या ठिकाणाहून पुन्हा अहमदाबादसाठी ३. वाजून ५५ मिनिटांनी रवाना होत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव विमानतळावर नाईट लँडिगची सुविधा नाही. लवकरच हिवाळा सुरु होत असल्याने, या महिन्यांमध्ये दिवस लहान असतात. त्यामुळे मुंबईहून विमान निघाल्यानंतर जळगावला येतांना अंधार पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नाईलाजस्त जळगावला विमान लॅडिंग न करता, थेट अहमदाबादलाच विमान न्यावे लागते. त्यामुळे असा प्रकार उद्भऊ नये, यासाठी विमानसेवेचे लवकरच वेळापत्रक बदलण्यात येणार आहे.

Web Title: Schedule changes for the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.