चाळीसगाव : शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित एस. सी. आर कळंत्री प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष यांनी शाळेचे प्रोसेडिंग घरी नेल्याचा आरोप संस्थेचे संचालक व बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी केला. डॉ. सुनील राजपूत हे कळंत्री विद्यालयाचे चेअरमन आहेत.
याबाबत संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनाही अग्रवाल यांनी पत्र दिले आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पुन्हा असा प्रकार घडणार नाही, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे. संस्थेच्या नियमानुसार शाळेचे कुठलेही कामकाज करताना शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन झाले पाहिजे. डॉ. राजपूत हे विश्वासात घेत नसल्याचा आरोप अग्रवाल यांचा आहे. शाळेत झालेल्या काही कामकाजाबाबत प्रोसेडिंग बुकात काय नोंद आहे, याची माहिती वेळोवेळी मागितली. तथापि, ती मिळाली नाही. यासाठी काही संचालक शाळेत गेले. त्यांनी मुख्याध्यापक दायमा यांच्याकडे प्रोसिडिंग मागितले. ते चेअरमन यांनी घरी नेल्याचे सांगितले आणि तसे प्रमोद दायमा यांनी लिहूनही दिले. प्रोसिडिंग बुक म्हणजे कोणत्याही संस्थेची मालमत्ता असते. ते चेअरमन असले तरी त्यांना ते घरी नेता येत नाही.
.....
प्रोसिडिंग बुक हे शाळेतच असते. मात्र, स्वाक्षरी करण्यासाठी मुख्याध्यापक ते घेऊन येतात. त्यानुसार स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी प्रोसिडिंग बुक आणले होते. पुन्हा ते शाळेत घेऊन गेले आहेत.
-डॉ. सुनील राजपूत, अध्यक्ष एस. सी. आर. कळंत्री प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव