चाळीसगावात एसडीआरएफची टीम दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 01:22 PM2021-08-31T13:22:38+5:302021-08-31T13:36:24+5:30
धुळे येथील ३० जणांचे एसडीआरएफ पथक येथे दाखल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : शहर व ग्रामीण भागात महापुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसुल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले असून कन्नड घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.
कन्नड घाटातील वाहतुक थांबविण्यात आली असून प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे. घाटाच्या मध्ये काही प्रवाशी अडकून पडले आहे.
ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे. मंगळवारी रात्री ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कडधान्ये, बाजरी, ज्वारी, फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.
नगरदेवळास्टेशन पुलाजवळ पुरस्थीती गंभीर होत असल्याने व पुरवाढत असूल्याने भडगावचे पिआय गजानन पढगळ आपल्या ताफ्यासह तातडीने हजर.
चाळीसगावचा बामोशी बाबाचा दर्गापर्यंत पाणी गेल्यामुळे त्याठिकाणी पाणी साचल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी.
दोन दिवसांपासून डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाल्याने हे हिवरा माध्यम प्रकल्प 100 टक्के भरण्याची शक्यता.... शेतकऱ्यांमध्ये आनंद....