चाळीसगावी दुकानाला लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 PM2021-05-09T16:20:28+5:302021-05-09T16:22:04+5:30

दुकानदारांकडून २१ हजार ५०० रुपये दंड  वसूल करण्यात आला.   

Seals affixed to Chalisgaon shop | चाळीसगावी दुकानाला लावले सील

चाळीसगावी दुकानाला लावले सील

googlenewsNext
ठळक मुद्देकोरानातील संचारबंदीचे उल्लंघनन.पा व पोलीस पथकाची कारवाई

चाळीसगाव : कोरोनातील संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरुच असून शुक्रवारी व शनिवारी रेडिमेड कपडे दुकाने सील करण्यात आली. दोन वेळा कारवाई व दंड करुनही पुन्हा व्यवसाय करणाऱ्या परिवार कलेक्शन या दुकानाला शनिवारी थेट सील लावण्यात आले. ३५ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला. ही कारवाई पालिकेच्या पथकासह पोलिसांनी केली.
कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी टाळेबंदी लावण्यात आली आहे. मात्र तरीही काही दुकानदार दुकाने उघडी ठेवत आहे. त्यांच्याविरोधात पालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
शुक्रवारीही दुकानांवर कारवाई
कोरोना काळातील संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर शुक्रवारी पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. मिलन कलेक्शन व नागदेव ड्रेसेस ही दुकाने सील करण्यात आली. एकूण बारा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार ५०० रुपये दंड  वसूल करण्यात आला. 
 
शेवटी दुकानाला लावले सील
बाजारपेठेत असलेल्या परिवार कलेक्शन या रेडिमेड कपडे विकणाऱ्या दुकानदाराला यापूर्वी पथकाने दोन वेळा दंडही केला. शनिवारी पथकाला हे दुकान पुन्हा सुरुच असल्याचे आढळून आले. दुकानात ग्राहकांची गर्दीही दिसून आली. यावेळी पो.नि. विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय कापडणीस, उपनिरीक्षक टकले यांच्या उपस्थित न.पा. पथकातील दिनेश जाधव, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, संजय देशमुख, प्रशांत सोनवणे, सुमित सोनवणे, प्रसाद बाविस्कर आदींनी दुकानाला सील ठोकत ३५ हजाराचा दंड वसूल केला. इतर दुकानदारांकडूनही तीन हजार ८०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
 

Web Title: Seals affixed to Chalisgaon shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.