चाळीसगाव : कोरोनातील संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरुच असून शुक्रवारी व शनिवारी रेडिमेड कपडे दुकाने सील करण्यात आली. दोन वेळा कारवाई व दंड करुनही पुन्हा व्यवसाय करणाऱ्या परिवार कलेक्शन या दुकानाला शनिवारी थेट सील लावण्यात आले. ३५ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला. ही कारवाई पालिकेच्या पथकासह पोलिसांनी केली.कोरोनाचे संक्रमण थांबावे यासाठी टाळेबंदी लावण्यात आली आहे. मात्र तरीही काही दुकानदार दुकाने उघडी ठेवत आहे. त्यांच्याविरोधात पालिकेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.शुक्रवारीही दुकानांवर कारवाईकोरोना काळातील संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर शुक्रवारी पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. मिलन कलेक्शन व नागदेव ड्रेसेस ही दुकाने सील करण्यात आली. एकूण बारा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. शेवटी दुकानाला लावले सीलबाजारपेठेत असलेल्या परिवार कलेक्शन या रेडिमेड कपडे विकणाऱ्या दुकानदाराला यापूर्वी पथकाने दोन वेळा दंडही केला. शनिवारी पथकाला हे दुकान पुन्हा सुरुच असल्याचे आढळून आले. दुकानात ग्राहकांची गर्दीही दिसून आली. यावेळी पो.नि. विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय कापडणीस, उपनिरीक्षक टकले यांच्या उपस्थित न.पा. पथकातील दिनेश जाधव, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, संजय देशमुख, प्रशांत सोनवणे, सुमित सोनवणे, प्रसाद बाविस्कर आदींनी दुकानाला सील ठोकत ३५ हजाराचा दंड वसूल केला. इतर दुकानदारांकडूनही तीन हजार ८०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
चाळीसगावी दुकानाला लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:20 PM
दुकानदारांकडून २१ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
ठळक मुद्देकोरानातील संचारबंदीचे उल्लंघनन.पा व पोलीस पथकाची कारवाई