सात हजार नागरिकांना दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:34+5:302021-03-14T04:15:34+5:30
दिव्यांग बोर्ड बंदच जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बोर्ड बंद करण्यात आले आहे. ...
दिव्यांग बोर्ड बंदच
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बोर्ड बंद करण्यात आले आहे. रुग्णसंख्या घटल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात साधारण नऊ महिने बोर्ड बंद असल्याने दिव्यांगांना दाखल्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या.
रुग्ण वाढले
जळगाव - इतर जिल्ह्यांतील मात्र जळगावात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून ही संख्या ३६ वर पोहोचली आहे. या रुग्णांवर जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार केले जात आहे. शुक्रवारी तीन जण बाधित आढळून होते. ही संख्या एकूण ५९४ झालेली असून त्यापैकी ५५८ जण बरे झालेले आहेत.
रुग्ण २० हजार पार
जळगाव : तालुक्याची रुग्णसंख्या २१ हजार २३२ वर पोहोचली आहे. यात जळगाव शहरात तब्बल १८२३४ रुग्ण आढळून आले आहेत. तर, ग्रामीण भागात २९९८ रुग्ण आहेत. मृतांची संख्याही चारशेपेक्षा जास्त झाली असून जिल्ह्याच्या २५ टक्के रुग्ण हे एकट्या जळगाव तालुक्यात असल्याचे गंभीर चित्र आहे.
मृत्यू शंभरापेक्षा अधिक
जळगाव : जिल्ह्यात विविध भागांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असून रावेर तालुक्यातील मृतांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. यासह भुसावळ २०८, अमळनेर १०३ या तालुक्यांमध्येही शंभरापेक्षा अधिक कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. चोपडा तालुक्यात ८५ बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे.