सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:57+5:302021-05-13T04:16:57+5:30
------------------------ रस्त्यांची दुरूस्ती करा जळगाव : चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नागरिक कर भरणा करतात. दुसरीकडे शासनाकडूनही मनपाला निधी मिळत ...
------------------------
रस्त्यांची दुरूस्ती करा
जळगाव : चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नागरिक कर भरणा करतात. दुसरीकडे शासनाकडूनही मनपाला निधी मिळत असतो. मात्र, असे असतानासुध्दा नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेच्या खड्ड्यांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे इरफान शेख यांनी केली आहे.
-------------------------
परीक्षा शुल्क कमी करावे
जळगाव : पालकांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे विद्यापीठाकडून एमबीएच्या अंतिम सत्राच्या परीक्षेचे शुल्क अधिक घेतले जात आहे. त्यात हजार रुपये शुल्क हे प्रोजेक्ट रिपोर्टच्या तोंडी परीक्षेचे आकारले जात आहे. आधीच पालक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी विदयार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
-------------------------
मानियार बिरादरीतर्फे गरजूंना मदत
जळगाव : ईद साजरी करता यावी म्हणून मानियार बिरादरीतर्फे गोरगरीब ५० कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत बिरादरीचे वरिष्ठ संचालक हारून शेख व अब्दुल रऊफ रहीम यांच्याहस्ते देण्यात आली.
------------------------
आरटीई प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा
जळगाव : राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेलासुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया कधी सुरू होईल, अशी विचारणा आता पालकांकडून होत आहे. अनेकांनी तर पडताळणी समितीचे कार्यालयसुध्दा गाठले आहे. मात्र, प्रक्रिया बंद असल्यामुळे पालकांना खाली हात घरी परतावे लागत आहे.