राष्ट्रवादीच्या परिसंवादात शिवसेनेच्या विरोधात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:10+5:302021-02-21T04:30:10+5:30

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिसंवाद यात्रा घेतली. तीन दिवसात त्यांनी जिल्हा पिंजून काढला. हजारो ...

In the seminar of NCP, tone against Shiv Sena | राष्ट्रवादीच्या परिसंवादात शिवसेनेच्या विरोधात सूर

राष्ट्रवादीच्या परिसंवादात शिवसेनेच्या विरोधात सूर

Next

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिसंवाद यात्रा घेतली. तीन दिवसात त्यांनी जिल्हा पिंजून काढला. हजारो कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यात त्यांनी जेथे राष्ट्रवादीचे आमदार नाही आणि मित्र पक्षांचे आमदार आहेत. त्या मतदारसंघातही बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याच्या सूचना दिल्या. त्यांचा आढावा घेतला. मात्र या दौऱ्यात सूर हा भाजप विरोधी असणे अपेक्षित होते. त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मुख्य रोख हा भाजप पेक्षा शिवसेनेच्या विरोधातच जास्त असल्याचे या दौऱ्यात जाणवत होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा करताना थेट शिवसेनेवरच निशाणा साधला. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदार संघ तसा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शिवसेनेचे दिग्गज नेते यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी अजूनही महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील टशन कायम आहे. एकमेकांच्या कामांवर फुली मारणे, हेच सध्या सुरू आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. असाच काहीसा प्रकार फैजपूर ता. यावल येथील सभेत घडला. रावेर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. त्याच वेळी भर सभेत मंत्री जयंत पाटील यांनी पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांना पुढच्या निवडणुकीत निवडून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. फक्त भाजप नको म्हणून हे तीन पक्ष सत्तेत आले आहेत. मात्र एकमेकांच्या मतदार संघात जेथे आमदार आहेत तेथे अशा घोषणा केल्यानंतर त्याच काय पडसाद पडतात. हे येत्या काळातच समोर येईल.

Web Title: In the seminar of NCP, tone against Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.