मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील पूर्णाड येथील प्रादेशिक परिवहन तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाºया चोरट्या वाहतुकीविरोधात शनिवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी परिवहन अधिकाºयांनी तपासणी नाक्यावरील मधल्या रस्त्यातून जाणारी अवजड वाहतूक सायंकाळपर्र्यंत बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पूर्णाड येथील सीमा तपासणी नाक्यावर एका खासगी कंपनीचे अवजड वाहन वजन काटा करण्याचे कंत्राट आहे. सदरील कंपनीचे भ्रष्ट अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने तपासणी नाका चुकवून ओव्हरलोड वाहने वजन काटा तपासणी नाक्यावरीलच मधल्या व चोरट्या मार्गाने तोतया आरटीओमार्फत पैसे घेऊन अवजड वाहने काटा न करताच सोडले जातात. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या महसूल बुडत आहे. प्रादेशिक परीवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी आणि खासगी कंपनी यांच्या संगनमताने हे सुरू आहे. यासाठी वारंवार निवेदने देवूनही चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरुच आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक होत पुरनाड सीमा शुल्क तपासणी नाक्यावर अधिकाºयांना घेराव घालीत निदर्शने व आंदोलन केले.आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गोपाळ सोनवणे, तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, मुशीर मणियार, सलीम खान, जाफर अली, जहीर शेख, सुपडू खाटीक, फय्याज शेख, उपतालुकाप्रमुख बाळा भालशंकर , शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, युवासेना तालुका प्रमुख सचिन पाटील, अमरदीप पाटील, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र तळेले, संतोष माळी, गजानन पाटील, भास्कर पाटील, नीलेश महाजन, श्रीकांत पाटील, राजू पाटील, अजाबराव पाटील, प्रशांत पाटील, भागवत कोळी, संभाजी पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पूर्णाड तपासणी नाक्यावर चोरट्या वाहतुकीविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 6:49 PM
पूर्णाड येथील प्रादेशिक परिवहन तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाºया चोरट्या वाहतुकीविरोधात शनिवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी परिवहन अधिकाºयांनी तपासणी नाक्यावरील मधल्या रस्त्यातून जाणारी अवजड वाहतूक सायंकाळपर्र्यंत बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देमधल्या चोरट्या मार्गाने होतेय वाहतूकअवैध वाहतुकीसाठी आरटीओसह खासगी कंपनीचेही सहकार्यलेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे