(शॉर्ट न्यूज) पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या उमेदवार महिलेविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:24+5:302021-01-17T04:15:24+5:30

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथे मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या जयश्री प्रभाकर गायकवाड (४०) या महिला उमेदवाराविरुध्द तालुका पोलीस ...

(Short News) Crime against a woman candidate who was arguing with the police | (शॉर्ट न्यूज) पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या उमेदवार महिलेविरुध्द गुन्हा

(शॉर्ट न्यूज) पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या उमेदवार महिलेविरुध्द गुन्हा

Next

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथे मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या जयश्री प्रभाकर गायकवाड (४०) या महिला उमेदवाराविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कलम १८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. कानळदा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान सुरु असताना शुक्रवारी सायकाळी ५ वाजता जयश्री गायकवाड या समर्थकांनी आरडाओरड करुन पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप शालीग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहारी येथून तरुण बेपत्ता (फोटो क्र.५०)

जळगाव : लोहारी, ता.पाचोरा येथील गिरीश उर्फ बंटी छगन पाटील (२०) हा तरुण १४ रोजी दुपारी गावातून बेपत्ता झालेला आहे. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र, मिळून आला नाही. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तो गायब झाल्याने भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

विवेक ठाकरेच्या अटकपूर्ववर युक्तीवाद पूर्ण

जळगाव : बीएचआर प्रकरणात पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विवेक ठाकरे याने पुणे न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी पुुणे न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यावर मंगळवारी निर्णय होणार आहे. त्याशिवाय डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जामीनावर सुजीत वाणी याच्या जामीनावर सोमवारी तर ठाकरे याच्या जामीनावर मंगळवारी कामकाज होणार आहे.

Web Title: (Short News) Crime against a woman candidate who was arguing with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.